Home शासकीय जागतिक जल दिनानिमित्त…हर घर जल व ओ.डी.एफ प्लस ग्रामपंचायती करण्याचा ठराव घेण्यात येणार                                        -संजयसिंह चव्हाण

जागतिक जल दिनानिमित्त…हर घर जल व ओ.डी.एफ प्लस ग्रामपंचायती करण्याचा ठराव घेण्यात येणार                                        -संजयसिंह चव्हाण

23 second read
0
0
199

no images were found

जागतिक जल दिनानिमित्त…हर घर जल व ओ.डी.एफ प्लस ग्रामपंचायती करण्याचा ठराव घेण्यात येणार

                                       –संजयसिंह चव्हाण

कोल्हापूर :  जागतिक जल दिनानिमित्त  ग्रामसभेची बैठक घेऊन  ग्रामपंचायतीने त्यांच्या पाणी आणि स्वच्छता स्थितीचा विचार करुन हर घर जल किंवा हागणदारीमुक्त अधिक दर्जा प्राप्त केल्याबाबतचा ठराव  पारित करण्यात येणार आहे.  जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये हर घर जल व ओडीएफ प्लस बाबतचे ठराव 22 मार्च 2023 जलदिनाचे औचित्य साधुन घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिली.

हागणदारीमुक्त भारत हा असाधारण मैलाचा दगड पुढे नेत, संपुर्ण ग्रामीण स्वच्छता शाश्वता टिकवण्याच्या अनुषंगाने स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा २ अंर्तगत ग्रामीण लोकांचा सहभाग व जनजागृती करुन ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना वैयक्तिक शौचालयाची उपलब्धता करुन देणे तसेच आवश्यकतेनुसार सार्वजनिक शौचालय बांधकाम, घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी व्यवस्थापन, मैला गाळ व्यवस्थापन, प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन याबाबींच्या अनुषंगाने कार्यवाही करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने कार्यवाही करुन ज्या गावांनी घन कचरा किंवा द्रव कचरा सांडपाणी व्यवस्थापन पूर्ण केले आहे, त्यांनी त्यांच्या ग्रामसभेत स्वतःला हागणदारीमुक्त अधिक घोषित करणारा ठराव पारित केला जाणार आहे.
 जल जीवन मिशनच्या निकषानुसार गावातील सर्व घरांना कार्यात्मक घरगुती नळ जोडणी तसेच शाळा आणि अंगणवाडी सार्वजनिक संस्थांना कार्यात्मक नळ जोडणी देणे आवश्यक आहे. त्यांनतर अशी गावे हर घर जल) म्हणुन घोषित करण्यात येणार आहेत. त्यानुसार ज्या गावांनी जल जीवन मिशनचे निकष विचारात घेऊन गावातील सर्व घरांना कार्यात्मक घरगुती नळ जोडणी तसेच शाळा आणि अंगणवाडी सार्वजनिक संस्थांना कार्यात्मक नळ जोडणीव्दारे पाणी पुरवठा सुरु केला आहे अशा ग्रामपंचायतींमार्फत ग्राम सभा घेऊन हर घर जल ठराव पारित करण्यात येणार आहे.
 दि. २२ मार्च हा दिवस सर्वत्र जागतिक जल दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने ग्राम पंचायत स्तरावर विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.  या उपक्रमांततर्गत ग्रामपंचायत, शाळा, महाविद्यालय येथे जल प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे. तसेच FTK किट व्दारे सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची तपासणी प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. जलस्त्रोत परिसर स्वच्छता व पाणी साठवण टाकी सफाई मोहीमही राबविण्यात येणार आहे. लोक वर्गणी, पाणीपट्टी, लोकवाटा गोळा करण्याबाबत गृहभेट मोहीम राबविण्यात येणार आहे. गृहभेटी दरम्यान घरगुती पिण्याच्या पाण्याची साठवण, हाताळणी, पाणी अशुध्द होण्याची कारणे याबाबत ग्रामस्थांना माहिती देण्यात येणार आहे. तसेच शाळा व महाविद्यालयांमध्ये प्रभातफेरी, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांनी दिली आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन   पुण…