
no images were found
‘मविआ’तून बाहेर पडण्याचे आवाहन: दीपक केसरकर
कोल्हापूर : ”काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फसविले आहे. ठाकरे यांनीच आम्हाला जायला सांगितले. एवढेच नव्हे तर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर ठाकरे यांनी काँग्रेस-”राष्ट्रवादी’कडून आपली फसवणूक झाल्याची कबुली दिली होती, असा दावा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.दोन्ही काँग्रेसशी असणारी युती ठाकरे यांनी तोडावी. आजही आम्ही त्यांच्यासोबत जायला तयार आहे, असेही ते म्हणाले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने श्री अंबाबाई मंदिरातील विकासकामांना सुरुवात केली आहे. याची पाहणी करण्यासाठी केसरकर कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
त्यावेळी ते म्हणाले की, जनतेच्या प्रश्नासाठी आवाज उठवल्यामुळे जनतेने आम्हाला आमदार केले . आम्हाला विकत जायचे असते तर आम्ही मागील अडीच वर्षातच गेलो असतो. उद्धव ठाकरे यांना आम्ही फसवलेली नाही, तर त्यांनीच आम्हाला पक्ष सोडायला लावला आहे. दिल्लीत जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदीची भेट घेतली असता हिंदुत्व आम्ही सोडले असून काँग्रेस ,राष्ट्रवादी सोबत जात असल्याची त्यांनी कबूल केले होते. महाराष्ट्रात गेल्यानंतर ही चूक दुरुस्ती करू अशी त्यांनी सांगितले होते. त्यांनी दिलेलं शब्द पाळला नाही आणि जनतेची फसवणूक केली आहे. उद्धव ठाकरे यांना काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेसने फसवले आणि त्याचा राग आमच्यावर काढला आहे. खोकी घेतली म्हणतात. खोक्यावर खेळण्याची सवय आदित्य ठाकरे यांनाच आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना कोकणचा २५ कोटीचा निधी अजित पवारांनी रोखून धरला. त्यावेळी आदित्य ठाकरे कुचेष्टाने हसत होते. बाळासाहेबांनी कोकणातील माणसांच्या जीवावर शिवसेना उभी केली. आज याच कोकणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साडेतेराशे कोटी दिले आहेत त्यामुळे कोकणचा विकास होऊ लागला आहे.