Home शासकीय मुंबई येथे 112 वी डाक अदालत

मुंबई येथे 112 वी डाक अदालत

12 second read
0
0
74

no images were found

मुंबई येथे 112 वी डाक अदालत

कोल्हापूर, : महाराष्ट्र सर्कल मुंबईव्दारे 112 वी डाक अदालत दिनांक 24 मार्च 2023 रोजी दुपारी 3 वाजता मुख्य पोस्टमास्तर जनरल यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती कोल्हापूर डाकघर विभागाचे प्रवर अधीक्षक ए.व्ही.इंगळे यांनी दिली आहे.                        महाराष्ट्र आणि गोवा राज्याशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालत मध्ये दखल घेतली जाईल. विशेषत: टपाल वस्तू, मनी ऑर्डर, बचत बँक खाते, प्रमाणपत्र इत्यादी बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा.          संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार सहाय्यक निर्देशक डाकसेवा (ज.शि.) आणि सचिव, डाक अदालत, मुख्य पोस्टमास्टर जनरल यांचे कार्यालय, मुंबई एनेक्स बिल्डिंग, जी.पी.ओ. कॉम्प्लेक्स, चौथा माळा, मुंबई- 400001 यांच्या नावे दोन प्रतीसह दिनांक 17 मार्च 2023 पर्यंत अथवा त्यापूर्वी पोहोचेल अशा रितीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…