Home मनोरंजन संस्कृतीच्या पदराखाली नाकारलं जाणारं तिचं अस्तित्व अशा कथासूत्रावर बेतला “फुला”

संस्कृतीच्या पदराखाली नाकारलं जाणारं तिचं अस्तित्व अशा कथासूत्रावर बेतला “फुला”

34 second read
0
0
14

no images were found

संस्कृतीच्या पदराखाली नाकारलं जाणारं तिचं अस्तित्व अशा कथासूत्रावर बेतला “फुला”

वाघ्या-मुरळीची पारंपरिक संस्कृती, संगीतमय गोष्ट, एका स्त्रीचा संघर्ष  “फुला” या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.  १७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच करण्यात आला असून, टीजरनंतर आलेल्या ट्रेलरने चित्रपटाविषयीची उत्सुकता आता अधिकच वाढवली आहे.                                                              पैलवान अजित शिवाजी जाधव यांनी “फुला” या चित्रपटाची निर्मिती केली असून शिवशर्विल मूव्ही आणि बोधी सिनेमा यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे.  चित्रपटाची कथा अभिषेक जावीर यांची असून दिग्दर्शनही त्यांचेच आहे तर चित्रपटाची पटकथा रवीकिरण जावीर यांनी लिहिली आहे. समाधान ऐवळे यांनी संगीत दिग्दर्शन, अमर देवकर यांनी सर्जनशील दिग्दर्शन, रवीकिरण जावीर, समाधान ऐवळे यांनी गीतलेखन, प्रताप जोशी यांनी छायांकन, निर्मिती रचना अतुल लोखंडे यांनी केली राहुल प्रजापती यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. वैशाली सामंत, वैशाली माडे, रोहित राऊत, रवींद्र खोमणे, वैशाली कुलकर्णी, वैष्णवी आदोडे, आकाश नवगिरे यांनी चित्रपटातील गाण्यांना आवाज दिला आहे. प्रियांतिका, आरोही गडदे, मंजुषा खेत्री, संतोष शिंदे, देवा गाडेकर, रविकिरण जावीर, सनी कदम, छाया आदट, शरद लांडगे या नव्या दमाच्या कलाकारांचा उत्तम अभिनय आपल्याला या चित्रपटात पहायला मिळणार आहे. नृत्य दिग्दर्शन आशुतोष कीर्तिकर  आणि सृष्टी जाधव  यांचे आहे. वेशभूषाकार  कोमल जावीर, अक्षता पाटील असून रंगभूषाकार समाधान भोरे  यांनी काम पाहिले आहे.

       लहान वयातच खंडोबाशी लग्न लावलेली एक मुलगी, तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी, संस्कृतीच्या पदराखाली नाकारलं जाणारं तिचं अस्तित्व अशा कथासूत्रावर “फुला” हा चित्रपट बेतला असल्याचं ट्रेलरवरून दिसून येतं. महाराष्ट्राच्या लोकपरंपरेतील तमाशा फड, जागरण गोंधळ या पारंपरिक सांस्कृतिक पटावर आधारित ही गोष्ट आकार घेते. देखण्या दृश्यप्रतिमा, नव्या असलेले कसदार कलाकार, अस्सल संगीताचा बाज या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. एकीकडे एआयसारख्या तंत्रज्ञानाचा विस्तार होत असताना अजूनही परंपरांचा किती खोल पगडा समाजावर आहे याचा विरोधाभास हा चित्रपट अधोरेखित करतो. आटपाडीतील काही तरुणांनी एकत्र येऊन केलेल्या या वेगळ्य़ा धाटणीच्या चित्रपटात सात गाणी, टीजरला लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे  आता अधिकच उत्सुकता निर्माण केली आहे. आटपाडी तालुक्यातील निंबवडे सारख्या ग्रामीण भागात या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. संगीतमय पद्धतीनं मांडलेला संघर्ष या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. नव्या दमाच्या कलावंतांची ही अस्सल कलाकृती पाहण्यासाठी आता १७ एप्रिलपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…