no images were found
सुप्रसिद्ध अभिनेत्री स्मिता शेवाळे साकारणार नामांकित वकील गीतांजली सरंजामेची भूमिका
स्टार प्रवाहवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिका अतिशय महत्त्वाच्या वळणावर येऊन पोहोचली आहे. रणदिवे कुटुंबाला वेठीस धरणाऱ्या मायाचं खरं रूप समोर आल्यानंतर कथानकाला वेगळीच दिशा मिळाली आहे. जानकी, ऐश्वर्या आणि अवंतिका या तिन्ही सुनांनी आता मायाविरोधात उघडपणे लढा देण्याचा निर्णय घेतला आहे.
या संघर्षाला आता कायदेशीर वळण मिळणार असून, मालिकेत दमदार कोर्टरूम ट्रॅक सुरू होणार आहे. मायाच्या बाजूने केस लढवण्यासाठी एण्ट्री होणार आहे नामांकित वकील गीतांजली सरंजामेची. ही भूमिका साकारणार आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री स्मिता शेवाळे. गीतांजली सरंजामे ही अत्यंत बुद्धिमान, आत्मविश्वासू आणि निष्णात वकील आहे. ती प्रत्येक केस अत्यंत शांतपणे आणि अचूकतेने हाताळते. तिच्या कारकिर्दीत तिने एकही केस गमावलेली नाही, त्यामुळे कोर्टात तिची एण्ट्री म्हणजे प्रतिस्पर्ध्यांसाठी मोठं आव्हान असतं. मायाची केस लढण्यासाठी गीतांजली रणांगणात उतरणार असून, जानकीची बाजू लढवणाऱ्या अवंतिकासोबत तिचा सामना रंगणार आहे. या लढाईत विजय नेमका कुणाचा होणार हे पहाण्यासाठी घरोघरी मातीच्या चुली मालिकेचे भाग न चुकता पहा दररोज रात्री १०.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.