no images were found
न्यू पॉलिटेक्निकचे विद्यार्थी राज्यस्तरीय प्रकल्प स्पर्धेत विजेते
श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी भारती विद्यापीठाचे काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूर आयोजित टेक्नोभारती 2K23 या राज्यस्तरीय प्रकल्प स्पर्धेत डिप्लोमा इंजिनिअरींग विभागाच्या ‘प्रोजेक्ट एक्स्पो’ मध्ये घवघवीत यश संपादन केले. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स मशीन लर्निंग (एआयएमएल) विभागातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या विद्यार्थ्यांनी ‘ AI Based Head Mouse using Python’ हा प्रकल्प सादर केला. पार्थ सुर्यवंशी, मोनिका सावंत, हर्ष सुतार, रेहान सय्यद व वैभवी स्वामी या विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले. याच स्पर्धेतील ‘माॅडेल मेकिंग’ या विभागात सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक पटकावला. प्रथमेश रेडेकर व महेश पाटील या विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले. या विद्यार्थ्यांना एआयएमएल विभागप्रमुख प्रा. अश्विनकुमार व्हरांबळे, सिव्हिल विभागप्रमुख प्रा. सुभाष यादव, प्रा. विक्रम गवळी, प्रा. कुलदीप पाटील यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे, संस्थेचे चेअरमन के. जी. पाटील यांचे प्रोत्साहन लाभले.