Home मनोरंजन सिद्धार्थ जाधव मोडणार स्वत:चाच रेकॉर्ड!

सिद्धार्थ जाधव मोडणार स्वत:चाच रेकॉर्ड!

6 second read
0
0
110

no images were found

सिद्धार्थ जाधव मोडणार स्वत:चाच रेकॉर्ड!

 

 

सिद्धार्थ जाधवच्या खुमासदार सूत्रसंचलनाने आता होऊ दे धिंगाणा कार्यक्रम महाराष्ट्राचा नंबर वन कथाबाह्य कार्यक्रम बनला. स्टार प्रवाह परिवारातल्या सर्वच सदस्यांसोबत सिद्धार्थने आता होऊ दे धिंगाणाच्या मंचावर धिंगाणा घातलाय. मात्र स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात सिद्धार्थ स्वत:चाच रेकॉर्ड मोडणार आहे. या सोहळ्यात तब्ब्ल ४०० कलाकारांसोबत धमाल टास्क खेळत सिद्धार्थ महाधिंगाणा घालणार आहे.

सिद्धार्थचा हजरजबाबीपणा सर्वश्रुत आहेच. विनोदाचं अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांना भरभरुन हसायला लावण्यात त्याचा हातखंड आहे. त्यामुळे स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात सिद्धार्थचा ४०० कलाकारांसोबतचा हा महाधिंगाणा नवा विक्रम ठरणार आहे. खास बात म्हणजे या पुरस्कार सोहळ्यात आता होऊ दे या कार्यक्रमासाठी सिद्धार्थ जाधवला सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालकाचा पुरस्कारही मिळणार आहे. तेव्हा पाहायला विसरु नका स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यातील सिद्धार्थ जाधवचा महाधिंगाणा रविवारी १९ मार्चला संध्याकाळी ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

 

 

 

 

 

 

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पंचगंगा स्मशानभूमीतील बेड उपलब्धतेसाठी रक्षाविसर्जन दुसऱ्याच दिवशी करण्याचे महापालिकेचे आवाहन

पंचगंगा स्मशानभूमीतील बेड उपलब्धतेसाठी रक्षाविसर्जन दुसऱ्याच दिवशी करण्याचे महापालिकेचे आव…