Home स्पोर्ट्स डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या, विद्यार्थ्याकडून राजगड-तोरणा सर

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या, विद्यार्थ्याकडून राजगड-तोरणा सर

2 second read
0
0
148

no images were found

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या,
विद्यार्थ्याकडून राजगड-तोरणा सर
कसबा बावडा/ वार्ताहर
डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी राजगड-तोरणागड यशस्वीरीत्या सर केला. सृष्टी अॅडव्हेन्चर क्लब व विद्यापीठच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून या ट्रेकचे आयोजन करण्यात आले होते.
मराठा साम्राज्याची पहिली राजधानी असलेला राजगड आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतलेला पहिला किल्ला असलेला तोरणा हे दोन्ही किल्ले हे साहसी तरुणासाठी नेहमीच आकर्षण ठरले आहेत. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने २५ व २६ फेब्रुवारी रोजी राजगड- तोरणा ट्रेकचे आयोजन करण्यात आले होते. सृष्टी अॅडव्हेन्चर क्लबच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या ट्रेकमध्ये ३७ विद्यार्थिनी व ३६ विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता.
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील राजगड आणि वेल्हे तालुक्यात्तील तोरणा या किल्यावर जाण्यासाठी पाली तळावरून विद्यार्थ्यांनी कूच केले. सुमारे २२ किलोमीटरचा हा ट्रेक विद्यार्थ्यानी उत्साहात पूर्ण केला. अमित कोष्टी (इचलकरंजी), आदित्य देसाई (कराड), हृषीकेश नेजे (इचलकरंजी) आणि प्रज्ञेश निगरे (कणकवली) यांच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वी करण्यात आला. त्यांच्यासोबत एनएसएस प्रोग्राम ऑफिसर आणि आडव्हेचर क्लब समन्वयक योगेश चौगुले, सुदर्शन साळोखे आणि विनायक लांडगे हे प्राध्यापक उपस्थित होते. हा ट्रेक यशस्वी करण्यासाठी ओमकार कोतमिरे, सुमित कांबळे, वैभव नागणे, ऋतुजा जगताप, प्रज्ञा महाडिक, पुनम पाटील, दिव्या फगारे या विद्यार्थी समन्वयकानी मेहनत घेतली.
संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे, डीन स्टुडंट अफेअर डॉ राजेंद्र रायकर यांचे विशेष सहकार्य लाभले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक २०२५’ पुरस्कार सोहळ्याची घोषणा…

‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक २०२५’ पुरस्कार सोहळ्याची घोषणा…   नवीन वर्षा…