no images were found
महापालिका कर्मचारी संघ अध्यक्ष संजय भोसले अखेर निलंबित
कोल्हापूर : महापालिकेत झालेल्या घरफाळा घोटाळ्यात चौकशी अधिकारी म्हणून काम केलेले महापालिका कर्मचारी संघाचे अध्यक्ष संजय भोसले त्याच घोटाळ्यात संशयीत आरोपी असल्याचे स्पष्ट झाले. त्यांचेवर लक्षीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आणि अटकेची कारवाई झाली. याबाबतचा अहवाल मिळताच प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी संजय भोसले यांच्या निलंबनाचा आदेश काढला.
भोसले हे कर निर्धारक व संग्राहक पदावर कार्यरत असताना घरफाळा विभागात झालेल्या आर्थिक अनियमितताप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. २२ फेब्रुवारी रोजी रात्री लक्ष्मीपुरी पोलिसांनी त्यांना अटक केली. २३ फेब्रुवारी ला न्यायालयात हजर केले असता त्यांना ६ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. महाराष्ट्र नागरी सेवा कायद्यानुसार एखाद्याला अटक केल्यापासून ४८ तास पोलिस कोठडीत अथवा न्यायालयीन कोठडीत राहिल्यास निलंबित मानले जाते. त्यामुळे संजय भोसले यांना महापालिका सेवेतून तत्काळ निलंबित करण्यात येत आहे. निलंबन काळात त्यांनी कोल्हापूर शहर सोडू नये. तसेच इतरत्र नोकरी करू नये. निलंबन काळात भोसले यांना उपायुक्त कार्यालयात दररोज हजेरी लावणे बंधनकारक असल्याचे आदेशात म्हटले आहे.