
no images were found
श्री करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूर्ती सौंदर्याला धक्का
कोल्हापूर : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या हजारो लाखो भक्तांचं श्रद्धास्थान श्री करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी राज्यातूनच नव्हे तर देशभरातून लाखो भाविक रोज कोल्हापुरात येत असतात. अंबाबाईच्या दर्शनासाठी भक्त कित्येक तास रांगेत उभे राहतात. मात्र अंबाबाईचं सौंदर्य कमी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.अनेक वर्षांपासून अंबाबाईच्या मूर्तीवर पुरातत्व खात्याकडून वज्रलेप आणि रासायनिक प्रक्रिया करून मूर्ती संवर्धन करण्याचं काम सुरू आहे. अंबाबाईच्या मूर्तीची सातत्यानं झीज होत असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. अंबाबाईच्या मूर्तीवर चुकीच्या पद्धतीनं संवर्धन केल्यानं मूर्तीचं रूप बदलल्याचा आरोप मूर्ती अभ्यासकांनी केलाय.
गेल्या अनेक वर्षांपासून मूर्तीला स्नान घालणं आणि दुग्धाभिषेक करणं बंद करण्यात आलं आहे. मूर्तीची अवस्था सध्या अत्यंत नाजूक झाली असून मूर्ती संवर्धनाबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे. अंबाबाईची मूर्ती ही प्राचीन काळातील असल्याने आता त्याची झीज होत आहे. मूर्ती काही ठिकाणी भग्न झाली आहे. दरम्यान पुरातत्व विभागाने यापूर्वीही वज्रलेप केला आहे. मात्र मूर्तीचे पाय, कंबर, हात आणि चेहरा या ठिकाणी बदल झाल्याचे दिसून येत आहे. देवीचं वाहन असणारं सिंहाची पाठीमागील बाजू पूर्णपणे दिसेनाशी झाली असून सिंहाचा चेहराही अस्पष्ट झाला आहे. देवीच्या बोटांची झीज झालीय. चेह-यावरील भाव बदलले गेले आहेत. इतकंच नाही तर मूर्तीवरील अलंकार, कलाकुसर अस्पष्ट झाल्याचा गंभीर आरोपही मूर्ती अभ्यासक प्रसन्ना मालेकर यांनी केला.
दरम्यान शास्त्राप्रमाणे भग्न झालेले मूर्ती पुजू नये असं सांगितलं जातं, मात्र कित्येक वर्ष अंबाबाईची मूर्ती अभिषेक न घालताच पुजली जात आहे. तर भक्तांना देखील लांबून म्हणजेच पितळी उंबराच्या बाहेरून दर्शन दिलं जात आहे. यामुळे आता सरकार आणि पुरातत्व विभाग आणि देवस्थान समितीकडून याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची गरज आ