
no images were found
कोर्लईतील ठाकरेंच्या मालमत्ता प्रकरणात दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
रायगड : जिल्ह्यात कोर्लईत उद्धव ठाकरे यांनी संपत्ती घेतली आहे. या संपत्तीचा हिशोब ठाकरे कुटुंबाला द्यावा लागेल, याचा पुनरुच्चार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. कोर्लईतील १९ बंगल्यांच्या कथित घोटाळा प्रकरणात आता अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. गुन्हे रजिस्टरमध्ये ठाकरे कुटुंबीयांचे नाव नसल्याचे पुढे आले आहे.
कोर्लई ग्रामपंचायतीचे ३ तत्कालीन ग्रामसेवक, ४ तत्कालीन सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांवर रेवदंडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय…या सगळ्यांनी बेकायदेशीर नोंदी करून खोटे दस्तावेज बनवून सरकारची फसवणूक केल्याचा आरोप सोमय्यांचा आहे…तसंच निवडणूक शपथपत्रात उद्धव ठाकरे यांनी ही मालमत्ता लपवल्याचा आरोपही सोमय्यांनी केलाय…ही मालमत्ता रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांच्या नावावर असल्याची माहिती त्यांनी दिलीय
काल रात्री रेवदंडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआर क्रमांक २६, आयपीसी सेक्शनस ४२०, ४६५, ४६६, ४६८आणि३४ नुसार हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.मुरुडच्या ग्रामविकास अधिकारी संगिता लक्ष्मण भांगरे यांनी कोर्लई ग्रामपंचायत अधिकार्यांविरुद्ध फसवणूक, संगनमत केल्याने १९ बंगल्याच्या रेकॉर्डमध्ये खाडाखोड करणे, अशी तक्रार रेवदंडा पोलीस स्टेशन येथे नोंदवली आहे. अशी माहिती सोमय्या यांनी दिली आहे.