no images were found
“खासदार चषक” बुद्धिबळ स्पर्धेत रेंदाळचा श्रीराज भोसले अजिंक्य
कोल्हापूर : चेस असोसिएशन कोल्हापूरने आयोजित केलेल्या खासदार चषक खुल्या जलद आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम नवव्या फेरीनंतर आठवा मानांकित रेंदाळचा श्रीराज भोसले तृतीय मानांकित पुण्याचा निखिल दीक्षित व अग्रमानांकित कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय मास्टर सम्मेद शेटे या तिघांचे समान आठ गुण झालेमुळे सरस टायब्रेक गुणामुळे रेंदाळचा श्रीराज भोसले अजिंक्य ठरला तर पुण्याच्या निखिल दीक्षितला उपविजेत्यापदावर व अग्रमानांकित कोल्हापूरच्या आंतरराष्ट्रीय मास्टर सम्मेद शेटेला तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले.
पुलाची शिरोली, येथील रुक्मिणी मल्टीपर्पज हॉल, झालेल्या या स्पर्धा स्विस लीग पद्धतीने जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार एकूण नऊ फेऱ्यात झाल्या. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे कोणतेही प्रवेश शुल्क नसलेली ही भारतातली पहिलीच खुली जलद आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा होती .
श्रीराजला रोख २१ हजार रुपये व आकर्षक चषक, निखिल ला रोख १५ हजार रुपये व आकर्षक चषक तर सम्मेद ला रोख १० हजार रुपये व आकर्षक चषक खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ खासदार धनंजय महाडिक खासदार क्रीडा महोत्सवचे प्रणेते पृथ्वीराज महाडिक यांच्या प्रमुख उपस्थित झाला.यावेळी स्पर्धेचे मुख्य आंतरराष्ट्रीय पंच व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव भरत चौगुले, मुख्य स्पर्धा संचालक मनीष मारुलकर, स्पर्धा सचिव धीरज वैद्य, स्पर्धा समन्वयक उमेश पाटील सर व उत्कर्ष लोमटे सर व्यासपीठावर उपस्थित होते.
खासदार धनंजय महाडिक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जीवनात खेळाचे महत्व पटवून दिले. आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले यांनी मुख्य पंच म्हणून काम पाहिले त्यांना इचलकरंजीचे करण परीट, रोहित पोळ व विजय सलगर सांगलीचे पौर्णिमा उपळवीकर विजय माने व दीपक वायचळ, कोल्हापूरचे मनीष मारुलकर,आरती मोदी, सूर्याजी भोसले,उत्कर्ष लोमटे व महेश व्यापारी व सोलापूरचे उदय यांनी सहकार्य केले.