no images were found
पुण्यातील कोरेगाव पार्क येथे पकडली सव्वा कोटींची वीजचोरी
पुणे : पुणे शहरातील कोरेगाव पार्क येथील एका व्यावसायिक वीज ग्राहकाने मीटरमध्ये फेरफार करून 3 लाख 37 हजार 215 युनिटची वीजचोरी केल्याचे उघड झाले. चोरी केलेल्या युनिटनुसार या ग्राहकास 1 कोटी 27 लाख 50 हजार रकमेचे बिल देऊन ते वसुल करण्यात आले.
सदर ग्राहकांने वीज मिटरच्या सिल सोबत छेडछाड करून मिटरमध्ये प्रत्यक्ष विजवापराची कमी नोंद होण्यासाठी रेजिस्टंन्स बसविले होते. त्यामुळे सदर ग्राहकाचा मिटर मधील वीज वापर प्रत्यक्षातील वीज वापरापेक्षा 79% कमी नोंदविला जात होता.
भारतीय वीज कायदा अनुसार या वीज ग्राहकास एक कोटी 27 लाख 50 हजार रकमेचे बिल देण्यात आले आहे. सदर रकमेचे बिल ग्राहकांनी भरल्यानंतर 6.6 लाख रुपये तडजोड शुल्क सुद्धा ग्राहकांनी भरले आहे.
नुकतेच प्रादेशिक संचालक यांनी एका परिपत्रकाद्वारे 20 किलोवॅट व त्यापेक्षा जास्त भार असलेल्या ग्राहकांच्या स्थळाचे निरीक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. त्यामुळे वीज चोरीचा छडा लागत असून वीज चोरांवर कारवाई करण्यात येत आहे.
पुणे प्रादेशिक विभागाचे संचालक अंकुश नाळे यांनी वीज चोरीविरुद्ध मोहीम राबविण्याचे निर्देश दिले असून त्यानुसार प्रादेशिक संचालक यांच्या निर्देशानुसार पुणे, सांगली, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात वीज चोरीविरुद्ध मोहीम राबविण्यात येत असून यामुळे वीज चोरांचे धाबे दणाणले आहे.