Home राजकीय उद्धव ठाकरेंची साथ सोडून चंद्रदीप नरकेंनी धरला मुख्यमंत्री शिंदेंचा हात.

उद्धव ठाकरेंची साथ सोडून चंद्रदीप नरकेंनी धरला मुख्यमंत्री शिंदेंचा हात.

4 second read
0
0
56

no images were found

उद्धव ठाकरेंची साथ सोडून चंद्रदीप नरकेंनी धरला मुख्यमंत्री शिंदेंचा हात.  

कोल्हापूर : शिवसेनेच्या फूटीनंतर संभ्रमावस्थेत असलेले करवीरचे माजी आमदार आणि कुंभी कासारी साखर कारखान्याचे चेअरमन चंद्रदीप नरके यांनी अखेर उद्धव ठाकरेंची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हात धरला.केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाबद्दल दिलेल्या निर्णयानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या पहिल्याच कोल्हापूर दौऱ्यात नरके यांनी हा मुहूर्त साधला.

   उद्धव ठाकरे यांना देखील धक्का देताना चंद्रदीप नरके यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणे पसंत केले. शिवजयंतीच्या शोभयात्रेसाठी आलेल्या ना. शिंदे यांच्या स्वागतासाठी चंद्रदीप नरके सामोरे जात त्यांनी जोरदार स्वागत केले. यांनी “मी उद्धव ठाकरेंसोबतच राहीन’ असा निर्धार केलेल्या चंद्रदीप नरके यांनी सध्या शिवसेना आणि धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे हे सांगण्याची गरज नाही. माझा पक्ष हा भाजप-शिवसेना महायुतीचा पक्ष असून हा पक्ष बाळासाहेब यांच्या विचारांचा आहे. यामुळे आम्ही सर्व शिवसैनिक एकत्र आलो आहोत. कुंभी कासारीच्या कारखान्याच्या निवडणुकीनंतर आता पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीची माझी तयारी सुरू असून गेल्या वेळेस निवडणूक हरल्यानंतर पाचव्या दिवशी मी पुन्हा कामाला लागलो आहे असे असे म्हणत त्यांनी आपली राजकीय दिशा स्पष्ट केली.

   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोल्हापूर दौरा त्यांच्यासाठी फलदायी आणि राष्ट्रवादी काँग्रेससह उद्धव ठाकरे गटाला धक्का देणारा ठरला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून इचलकरंजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष पदावर कार्यरत असणारे माजी नगरसेवक प्रकाश पाटील यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका अनिता कांबळे, शहर सरचिटणीस बाजीराव कुंभार यांनीही राष्ट्रवादीला रामराम करीत शिवसेनेचे धनुष्यबाण हातात घेतले. प्रकाश पाटील हे राष्ट्रवादीचे कट्टर कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. दोन वेळा ते इचलकरंजी नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. मात्र, गेल्या काही काळापासून ते नाराज असल्याची चर्चा होती. आज त्यांनी अचानक पक्षाच्या पदाच्या राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे देत असल्याचे सोशल मिडियातून जाहीर केले आणि थोड्याच वेळात त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश झाला. तसेच हेरवाड ग्राम पंचायत सदस्या छाया सुर्यवंशी, ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख माधुरी साखरे, कनवाडच्या ग्राम पंचायत सदस्या आसमा पटेल यांनीही शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे जिल्हा प्रमुखांनी सांगितले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापूर दौऱ्यावर आल्याने त्यांच्या उपस्थीतीत आमदार प्रकाश आवाडे, राहुल आवाडे, मोश्मी आवडे यांचा भाजप प्रवेश होत असल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र प्रत्यक्षात कोणाचाच पक्षप्रवेश झाला नाही. यामुळे आवडे कुटुंबिय भाजपचा मित्र पक्ष म्हणूनच अद्याप राहणार असल्याचे दिसून येत आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवछत्रपती पुरस्कार सोहळा ऐतिहासिक असेल- क्रीडामंत्री भरणे

शिवछत्रपती पुरस्कार सोहळा ऐतिहासिक असेल- क्रीडामंत्री भरणे   पुणे : अनेक वर्षांनंतर स…