no images were found
पंतप्रधान किसान योजनेच्या तेराव्या हप्ताचा मुहूर्त ठरला
कोल्हापूर : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा तेरावा हप्ता या महिन्यात शेतकर्याचा खात्यात जमा होणार आहे.
योजनेतंर्गत तेरावा हप्ता 27 फेब्रुवारी रोजी खात्यात जमा होणार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. या योजनेचा लाभ केवळ आधार संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होईल. आधार सीडिंग प्रलंबित लाभार्थ्यांनी बँकेत जाऊन आधार सीडिंग ई-केवायसी करुन घ्यावे, त्यासाठी महा-ई-सेवा केंद्र चालकांची मदत घ्यावी अथवा बँक खाते आयपीपीबीमध्ये भारतीय डाक विभागामार्फत उघडण्यात यावेत. ज्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी झालेले नाही, अशा शेतकऱ्यांनी आपल्या बँकेत जाऊन ई केवायसी पूर्ण करुन घ्यावे अथवा त्यासाठी महा ई-सेवा केंद्र चालकांची मदत घ्यावी किंवा त्या शेतकऱ्यांनी बँक खाती इंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये उघडावीत, असे आवाहन कोल्हापूरचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा पीएम किसान योजनेचे नोडल अधिकारी भगवान कांबळे यांनी केले आहे.
प्रलंबित लाभार्थ्यांची बँक खाती आयपीपीबीमध्ये नव्याने उघडल्यानंतर पुढील 48 तासांमध्ये ती आधार संलग्न होऊन सक्रिय होतील, अशी माहितीही त्यांनी दिली. सर्व प्रयत्न करुनही ई-केवायसी होत नसेल तरच पीएम किसान योजनेच्या पात्र लाभार्थांनी बँक खाती आयपीपीबीमध्ये उघडण्यात यावीत म्हणजे कोणताही लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, असेही जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.
ज्या शेतकऱ्यांनी अद्याप त्यांचे ई-केवायसी पूर्ण केले नाही त्यांना तेराव्या हप्त्याची रक्कम मिळणार नाही. पीएम किसान वेबसाईटनुसार, पीएम किसानमध्ये नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी अनिवार्य आहे. ओटीपी आधारित ई-केवायसी पीएम किसान पोर्टलवर उपलब्ध आहे. बायोमेट्रिक आधारित ई-केवायसी साठी जवळच्या सीएससी केंद्रांशी संपर्क साधता येईल. ई-केवायसी ची अंतिम तारीख 10 फेब्रुवारी होती.