no images were found
आयकर विभागाद्वारे बीबीसीची चौकशी सुरूच; विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला घेरले
नवी दिल्ली : बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबई कार्यालयात आयकर विभागाच्या पथकाने दुसऱ्या दिवशीही चौकशी सुरूच ठेवली. बीबीसी व्यवस्थापनाने आपल्या कर्मचाऱ्यांना मेल करून चौकशी पथकाला सहकार्य करण्यास सांगितले. कर्मचाऱ्यांनी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर प्रामाणिकपणे द्यावे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बीबीसीवर आंतरराष्ट्रीय करात अनियमितता केल्याचा आरोप केला आहे. बीबीसी व्यवस्थापनाने काल सकाळी कर्मचाऱ्यांना मेल केला. यात म्हटले की, चौकशी पथक तुमची भेट घेऊ इच्छित असेल तर तुम्ही त्यांना भेटा. संगणकातील कोणतीच माहिती डिलीट करू नका आणि आयकर विभागापासून ती लपवू नका. कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी हेल्पलाइन सुरू केली आहे. तुमचे वैयक्तिक उत्पन्न आणि आयकराबाबतचे प्रश्न चौकशीच्या बाहेरचे आहेत. त्यांची उत्तरे देण्यास नकार देऊ शकता.
काँग्रेसने विचारले की, पंतप्रधान अशा कारवाईद्वारे जगासमोर देशाची कशी प्रतिमा सादर करत आहेत? दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल म्हणाले, देशातील लोकशाही व्यवस्था व संस्था पायदळी तुडवत भाजप देशाला आपला गुलाम बनवू इच्छित आहे का?