
no images were found
पुणे : लोकशाही बळकटीसाठी कायद्याची भूमिका महत्त्वाची: रामराजे नाईक निंबाळकर
पुणे : “लोकशाहीच्या बळकटीसाठी कायद्याची भूमिका महत्वाची आहे. या देशात कायदा सर्वश्रेष्ठ आहे. अशा वेळेस कायदयाचे शिक्षण घेणार्या युवकांनी लोकशाहीच्या बळकटीसाठी चांगल्या उद्देशाने राजकारणात सक्रिय सहभाग घ्यावा.” असे विचार महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले. पुणे येथील माईर्स एमआईटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या विधी महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या पारितोषिक वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले,“संविधानात्मक मूल्यांचा अंगीकार प्रत्येकाने स्वीकारावा. महाराष्ट्राची विधान परिषद ही सर्वोत्तम काम करणारी आहे. वर्तमान काळात लोकहिताचे कायदे व धोरण बनवून त्याचे पालन करावे. तंत्रज्ञान व मानव यांच्या परस्पर संबंधांचे कायदे तयार करणे व व्यवस्था राखणे हे कायदयाचे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांनसमोर मोठे आवाहन आहे. त्यामुळे नैतिकमूल्ये व विवेक जोपासणे आवश्यक आहे.”
राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,“ या देशाापुढे जातीयता, गुन्हेगारी, सामुदाय कलह आणि भ्रष्टाचार हे सर्वात मोठे आवाहन आहे. त्यासाठी कडक कायदे व त्यावर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.”
यावेळी एमआयटी वर्ल्डपीस युनिव्हर्सिटीचे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड, कुलगुरू डॉ. आर.एम. चिटणीस, कुलसचिव गणेश पोकळे, विधी महाविद्यालयाच्या प्रमुख डॉ. पौर्णिमा इनामदार, डॉ. अश्विनी पंत, डॉ. कल्पना जायस आणि विद्यार्थी प्रतिनिधी अनिश खडे उपस्थित होते.