no images were found
एअर इंडियाची मालकी टाटा समूहाकडे; विमान खरेदीचा मोठा करार
नवी दिल्ली : इंडियाची मालकी टाटा समूहाकडे आली आहे. टाटा समूहाने आतापर्यंतचा सर्वात मोठा विमान वाहतूक करार केला आहे. टाटा समूहाच्या एअर इंडियाने ४७० विमान खरेदीच्या सौद्यावर स्वाक्षरी केली आहे. त्यात एअर इंडिया२५०एअरबस विमाने खरेदी करणार आहेत. तसेच २२० बोइंग विमाने आहेत. या सौद्याची किंमत६.४० लाख कोटी रुपयांवर आहे. या करारानंतर हवाई क्षेत्रात एअर इंडियाची मालकी ३०टक्के होणार आहे.
या करारामुळे भारत, फ्रान्स, अमेरिका आणि इंग्लडमध्ये रोजगारनिर्मिती होणार आहे. फ्रान्सच्या एअरबससोबतच्या करारावेळी व्हर्च्युअल पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी ,फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यान्यूअल मॅक्रो, टाटा समूहाचे अध्यक्ष एमरिट्स रतन टाटा आणि एअरबसचे प्रमुख गुयलॉमे फॉरी उपस्थित होते. यावेळी टाटा सन्सचे चेअरमन के. चंद्रशेखरन यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर समूहाने अमेरिकी कंपनी बोइंगसोबतही करार केला.
टाटा समूहाने६९वर्षांनंतर पुन्हा एअर इंडियाची मालकी घेतली. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर बदल सुरु केले आहेत. विमान वाहतूक क्षेत्रातील एअर इंडियाचा हा करार कंपनीसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. यामुळे प्रवाशांना आधिक चांगल्या सुविधा मिळणार आहे. यानंतर, भारतीय विमान कंपनी देशांतर्गत विमान वाहतूक क्षेत्रातील तिसरी मोठी कंपनी बनेल. टाटा समूह अनेक दिवसांपासून या कराराची तयारी करत होता. हा करार पूर्ण झाल्यानंतर कंपनीच्या इंधन खर्चात लक्षणीय घट होईल. तसेच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांना स्वस्त तिकिटे देणे सोपे होणार आहे.
टाटा समूहाच्या या सौद्यामुळे फ्रान्स, अमेरिका, इंग्लड आणि भारताचा फायदा होणार आहे. कारण विमाने अमेरिका आणि फ्रान्समध्ये बनणार आहे. इंजिन इंग्लडमध्ये तयार होणार आहे. भारतात विमाने येणार असल्याने हवाई क्षेत्रातील रोजगार निर्मिती वाढणार आहे.एअर इंडियाने २००५नंतर एकही विमान खरेदी केले नव्हते. आता१७ वर्षानंतर विमान खरेदी केली आहे. यापासून एअर इंडियाला उत्तर अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलियात आपले अस्तित्व वाढवण्यास मदत मिळेल.
एअर इंडिया आणि एअरबस यांच्यातील विमानांच्या या कराराबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अभिनंदन केले. टाटा समूहाने ऑर्डर केलेल्या विमानांमध्ये १४० A३२० विमाने७०A३२१ निओ विमाने आणि एअरबसची ४० A३५०विमाने आहेत.