no images were found
धार्मिक स्थळांवर नकली नाण्यांचा खेळ
मुंबई : दिंडोशी पोलीस ठाण्यात पुष्पा पार्क परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.जिग्नेश गाला याच्या कारमधून सुमारे 9 लाख 46 हजार रुपयांची बनावट जुनी नाणी जप्त करण्यात आली आहेत. जिग्नेश गेल्या अनेक दिवसांपासून नाणी बनवण्याच्या मशीनची निर्यात आणि आयात करत होता .दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुष्पा पार्क परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांकडून 1 रुपये ते 10 रुपयांपर्यंतची सुमारे 10 लाख बनावट तांबे आणि पितळी नाणी जप्त करण्यात आली आहेत. जिग्नेश गाला असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. जिग्नेशला त्याच्या गाडी आणि बनावट नाण्यांसह दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले . हरियाणामध्ये ही नाणी बनवण्याचा कारखाना चालवला जात होता. या कारखान्यावर दिल्लीच्या स्पेशल सेलने कारवाई करत 5 जणांना अटक केली.हे लोक मुंबईत मोठ्या प्रमाणावर बनावट नाणी आणायचे आणि धार्मिक स्थळांवर सुट्टे पैसे देण्याच्या नावाखाली खरे पैसे घ्यायचे. बऱ्याच कालावधीपासून आरोपींचा हा खोट्या नाण्यांचा खेळ सुरू होता.