no images were found
लातूर रेल्वे कारखान्यात वंदे भारत एक्स्प्रेसची निर्मिती करणार-रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव
लातूर रेल्वे कारखान्यात वंदे भारत एक्स्प्रेसची निर्मिती केली जाणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. दोन वर्षांपूर्वी हा कारखाना सुरू झाला असला तरी कोणत्याही मोठ्या प्रकल्पातील रेल्वे गाड्यांची बांधणी अद्यापही होऊ शकलेली नाही. मात्र आता वंदे भारतची निर्मिती या कारखान्यात सुरू होणार आहे. लातूरसह चेन्नई, सोनीपत, रायबरेली येथे वंदे भारत एक्सप्रेसची निर्मिती केलीजाणार आहे. अमृत भारत योजनेअंतर्गत देशातील 1272 रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. शहरापासून 18 किलोमीटर अंतरावर लातूर कोच फॅक्टरी आहे. 350 एकरवरील क्षेत्रापैकी 120 एकरवरील पहिल्यापेक्षा बांधकाम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. पहिला फेजमध्ये एका महिन्यात 16 कोच निर्मिती शक्य आहे तर पहिल्या फेज मध्ये वर्षाला 250 कोच, दुसऱ्या फेजमध्ये वर्षाला 400 कोच आणि तिसऱ्या फेज म्हणजे वर्षाला 700 कोच निर्मिती करणारा अवाढव्य कारखान्याच्या ल्या फेजची तयार 100 टक्के पूर्ण झाली आहे.