Home राजकीय विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत ‘मविआ’चे पारडे जड-हेंमत पाटील

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत ‘मविआ’चे पारडे जड-हेंमत पाटील

2 second read
0
0
68

no images were found

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत ‘मविआ’चे पारडे जड-हेंमत पाटील

 

 मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सुरूवातीच्या वातावरणानुसार मविआचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे. पंरतु, राज्यभरात गेल्या काळात पेटलेले मराठा आंदोलन, शिवाय पक्षांतर्गत बंडखोरीचा थोड्या अधिक प्रमाणात फटका दोन्ही आघाड्यांना बसण्याची शक्यता असल्याचे भाकित इंडिया अगेन्स्ट करप्शनचे (आयएसी) राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी आज, मंगळवारी (ता.२९) वर्तवले.

महायुती आणि महाविकास आघाडीने नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवार यादीचे घोंगडे भिजत ठेवले. काही ठिकाणी मविआने तर काही ठिकाणी महायुतीने योग्य उमेदवार दिले आहेत. मात्र, उद्धव ठाकरेंना सत्तेतून पायउतार करण्यासाठी शिवसेनेत झालेली बंडखोरी आणि या बंडखोरीला भाजपची फूस असल्याचे तयार करण्यात आलेले ‘नरेटिव्ह’, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पडलेली फूट या सर्व घडामोंडीचा थेट फटका महायुती, पर्यायाने देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाला बसण्याची शक्यता असल्याचा दावा देखील पाटील यांनी केला. लोकसभा निवडणुकीत मतदारांनी थेट मविआ च्या पदरीच अनेक जागा टाकल्या.

विद्यमान सरकारविरोधात धनगरांसह, आदिवासी, मराठा तसेच ओबीसी बांधवांची असलेली नाराजी लपून राहिलेली नाही. आरक्षणाचा समतोल साधण्याच्या प्रयत्नात सरकारने सर्वसामान्यांचा विश्वास गमावला. अशात अनेक ‘फ्री बी’ योजनांचा आधारे सरकार निवडणूक रिंगणात उतरले आहे. याचा फायदा सरकारला म्हणावा तेवढ्या होण्याची शक्यता नाहीच, उलटपक्षी मविआ या योजनांना लक्ष करून सत्ताधार्यांना निवडणुकीच्या मैदानात कोंडीत पकडण्याची शक्यता अधिक असल्याचे पाटील म्हणाले. प्रत्यक्षात निवडणूक प्रचाराचा धुराळा सुरू झाल्यावर याची प्रचिती येईल. तुर्त मविआ सत्तेत येण्याच्या शर्यतीत अग्रेसर असल्याचे दिसून येत असल्याचे पाटील म्हणाले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

‘वागले की दुनिया’च्या आगामी स्व-संरक्षण विषयक भागातून महिला सुरक्षेचा पुरस्कार

‘वागले की दुनिया’च्या आगामी स्व-संरक्षण विषयक भागातून महिला सुरक्षेचा पुरस्कार   सोनी…