no images were found
अर्थसंकल्पापूर्वी पेट्रोल, डिजेल आणि LPG चे नवे दर
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. हा अर्थसंकल्प मोदी सरकारच्या काळातील 10 वा तर सीतारामन यांचा चौथा अर्थसंकल्प असणार आहे. थोड्याच वेळात हा अर्थसंकल्प अर्थमंत्री संसदेत सादर करतील. या अर्थ संकल्पापूर्वी तेल कंपन्यांनीही आज बुधवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत.
राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. या किमती तशाच आहेत. ताज्या आकडेवारीनुसार, कच्च्या तेलाची किंमत पुन्हा एकदा 85 डॉलरच्या खाली आली आहे. बेंचमार्क ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल सुमारे 84.49 डॉलर आहे आणि डब्ल्यूटीआय क्रूड सुमारे 79.22 डॉलर प्रति बॅरल आहे. दरम्यान, अलिकडच्या काळात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली होती आणि ते 88 डॉलरच्या आसपास पोहोचले होते.
एलपीजीच्या दरात कोणताही बदल नाही
साधारणपणे दरमहिन्याच्यासुरुवातीला सरकारकडून एलपीजीच्या किमतीत बदल केला जातो. मात्र, यावेळी एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत दिल्लीत 1053 रुपये, कोलकात्यात 1079 रुपये, मुंबईत 1052.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 1068.50 रुपये इतकी आहे.