no images were found
अन्नपूर्णा खाद्य व खरेदी महोत्सवाचे आयोजन
कोल्हापूर/ प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ करवीर कोल्हापूर यांच्यावतीने व स्टार रिफाईंड ऑईल पुरस्कृत रोटरी अन्नपूर्णा खाद्य व खरेदी महोत्सवाचे आयोजन येत्या २ ते ६ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे. हा महोत्सव आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल मैदानावर सकाळी ११ ते रात्री १० या वेळेत सर्वांसाठी खुला राहणार आहे. या पाच दिवस चालणाऱ्या महोत्सवात खाद्य व खरेदीसह रंगतदार कार्यक्रमाचा आनंद लोकांना लुटता येणार आहे अशी माहिती क्लबचे प्रेसिडेंट रो. उदय पाटील आणि इव्हेंट चेअरमन रो. संभाजीराव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. महोत्सवाबद्दल अधिक माहिती देताना ते म्हणाले, दि. २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.०० वाजता महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी कराओके ट्रॅक सिंगिंग, ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी महाराष्ट्राची लोकधारा, ४ फेब्रुवारी सायंकाळी रॉक बँड तर दि. ५ फेब्रुवारी रोजी मराठमोळी ठसकेदार लावणी अश्या विविध कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. महोत्सवाचा समारोप विविध संस्था व सदस्यांच्या सत्काराने ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी होणार आहे.
महोत्सवातून मिळणाऱ्या निधीतून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. यामध्ये दिव्यांग मुलांना व्हीलचेअर, कर्णबधीरांना श्रवणयंत्रे, गरजू व ग्रामीण भागातील मुलांना सायकल वाटप, जयपूर फूटचे वाटप, गरजू क्षयरोगांना धान्य वाटप करण्यात येणार आहे. अश्या उपक्रमांद्वारे रोटरी आपल्या सामाजिक बांधिलकीची परंपरा नेहमी जपत आलेली आहे, व यापुढेही जपणार आहे. तरी या महोत्सवास आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. पत्रकार परिषदेस सचिव रो. स्वप्नील कामत, इव्हेंट सेक्रेटरी रो. हरीश पटेल, रो. प्रमोद चौगुले,रो. चंदाराणी पाटील, खाजनिस रो. दिलीप प्रधाने, व रोटरी क्लब करवीर चे सदस्य उपस्थित होते.