
no images were found
सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदु मानून काम करा – आ. जयंत पाटील
सांगली: राष्ट्रवादी काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा.आ.जयंतरावजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त,महाआरोग्य शिबिर सागलीवाडी येथील ल.पा.पाटील विद्यालयाच्या प्रांगणामध्ये आयोजित करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.आ.जयंतरावजी पाटील साहेब व उदघाटक महापालिकेचे आयुक्त मा.सुनिल पवार हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
या महाआरोग्य शिबिरातून जवळपास 21600 रुग्णांची मोफत तपासणी करून उपचार करण्यात आले.या शिबिरामध्ये , कॅन्सर,प्लॅस्टिक सर्जरी,ह्रदयाचे आजार,पोटाचे विकार ,हाडाचे शस्त्रक्रीया,मुतखड्याचे विकार,स्त्रीरोग तपासणी,दंत,कान,नाक,घास,त्वचारोग,रक्तदाब, शुगर व लहान मुलांची तपासणी करण्यात आली.तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया , चष्मे,श्रवणयंत्र,औषधे ईत्यादींचे वाटप करण्यात आले.ईसीजी एक्सरे,व ॲजिओग्राफी या विशेष मोफत सुविधा या शिबिरात उपलब्ध करून देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा.आ.जयंतराव पाटील साहेब आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की,गेल्या १० वर्षांपासून संजय बजाज यांनी माहेश्वरी समाजाची मदत घेऊन सांगली महानगरपालिका क्षेत्रात हे आरोग्य शिबिर राबविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यंदा सांगलीवाडी येथे हे शिबिर आयोजित केले आहे.
आतापर्यंत सुमारे हजारो लोकांनी त्याचा लाभ घेतला आहे. सामान्य माणसाला मोठी सेवा देण्याचे पुण्य आयोजक, डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी यांना मिळालेले आहे. शिबीरात सहभागी झालेले सर्व हॉस्पिटल, डायग्नोस्टिक सेंटर, अधिकारी, डॉक्टर्स, वैद्यकीय तंत्रज्ञ,आशा वर्कर्स, इ.योगदान देणाऱ्या सर्वांचे आभार संजय बजाज यांनी व्यक्त केले. या शिबिराचा मुख्य उद्देश असा की महापालिकाक्षेत्रामधील जी आर्थिक दृष्ट्या अतिशय दुर्बल आहेत जे आपल्या आर्थिक उत्पन्नातून वा पैशा अभावी आपल्या आजारावर उपचार करू शकत नाहीत अशा सर्व गरजू जनतेला त्यांचे आरोग्य चांगले रहावे या एकमेव उद्देशाने या शिबिराचे आयोजन दरवर्षी करण्यात येते.महापालिकाक्षेत्रामधील व वाळवा तालुक्यातील नऊ गावांतील महिला भगिनी असतील,, वृद्ध पुरुष असतील त्यांना आरोग्याच्या बाबतीत कुठलीच अडचण येऊ नये असा राष्ट्रवादी काँग्रेसचा नेहमीच मानस असतो..विविध प्रकारचे कॅन्सरचे उपचार केमोथेरपी गर्भाशयाचे व स्तनांचे कॅन्सर हाडांचे सर्व ऑपरेशन अपघात व फ्रॅक्चर मणक्याच्या शस्त्रक्रिया मेंदूंच्या शस्त्रक्रिया लहान मुलांच्या शस्त्रक्रिया इत्यादी रोगांविषयी प्राथमिक उपचार व मार्गदर्शन करण्यात आले.व आज 61 मोतीबिंदू रुग्णांचे ऑपरेशन करण्यात आले.
यावेळी शहर-जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन च्या खजिनदार पदी निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
शिबीर यशस्वी करण्यासाठी समस्त माहेश्वरी समाज , सेवानिवृत्त पोलिस कल्याणकारी संघटना व राष्ट्रवादी रिक्षा संघटनेचे व सर्व सहकारी यांचेही सहकार्य लाभले. यावेळी शहर-जिल्हाध्यक्ष संजयजी बजाज,युवक शहर-जिल्हाध्यक्ष राहुल पवार,महापौर दिग्विजय सूर्यवंशी,नगरसेवक हरिदास पाटील,अभिजित कोळी , सुरेश पाटील , धनपाल खोत , शेखर माने , सागर घोडके , धनंजय पाटील , डॉक्टर सेल चे डाॅ.पृथ्वीराज पाटील, डॉ प्रतीक यादव , डॉ तन्मय मेहता , नगरसेवक विष्णू माने, शेडजी मोहिते ,असिफ बावा ,अनिता पांगम , वंदना चंदनशिवे , ज्योती अदाटे , सुरेखा सातपुते,अमृता चोपडे ,संगीता जाधव ,डॉ शुभम जाधव , आयुब बारगीर,उमर गवंडी,किशोर हत्तीकर,तौशिक मुनशी ,मदन पाटील,अपर्णा कदम , संदीप व्हनमाने , अक्षय अलकुंटे , उत्तम कांबळे ,अर्जुन कांबळे , कुमार वायदंडे , संदीप दळवी , उषा गायकवाड , छाया पांढरे , प्रियांका तुपलोंढे ,अमित चव्हाण, सुमित कुंभोजकर ,मुन्ना शेख , अमीन शेख , आदित्य नाईक महालिंग हेगडे आदी उपस्थित होते