
no images were found
भारताचा ७५ वा अमृत महोत्सवा निमित्त भाजपा कोल्हापूर ओबीसी मोर्चाच्या वतीने जनजागृती पदयात्रा
कोल्हापूर : १५ ऑगस्ट २०२२ रोजी भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अभियाना अंतर्गत केंद्र सरकारच्या आवाहनानुसार “हरघर तिरंगा, घरघर तिरंगा” हा उपक्रम राबवण्यात यावा असे आवाहन देशातील सर्व नागरिक व रहिवाशी बांधवांना करण्यात येत आहे
याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टी कोल्हापूर ओबीसी मोर्चाच्यावतीने “हरघर तिरंगा, घरघर तिरंगा” या अभियानाअंतर्गत बिनखांबी गणेश मंदिर ते छ. शिवाजी महाराज चौक येथे जनजागृती पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेमध्ये उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी हरघर तिरंगा घरघर तिरंगा, भारत माता कि जय अशा घोषणा देत पदयात्रेची सांगता छ.शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, सरचिटणीस विजय जाधव, दिलीप मेत्रानी, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष संदीप कुंभार, ओबीसी जिल्हाध्यक्ष महेश यादव, जिल्हा उपाध्यक्ष राजू मोरे, विजय आगरवाल, मंडल अध्यक्ष विवेक कुलकर्णी ई. पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.