no images were found
राजर्षि शाहू महाराज वृद्ध साहित्यिक कलावंत मानधन योजनेसाठी माहिती सादर करण्याचे आवाहन
कोल्हापूर : राजर्षि शाहू महाराज वृद्ध साहित्यिक कलावंतांना मानधन योजनेअंतर्गत मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव तथा सचिव सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक १ मार्च २०२४ रोजी व्हिसीद्वारे बैठक आयोजित करुन ही योजना डीबीटीद्वारे राबवून चांगल्या प्रकारे लाभ देण्यासाठी संबंधित लाभार्थ्यांची संपूर्ण माहिती अद्यावत करण्याबाबत सूचित केले आहे. याअनुषंगाने सर्व वृद्ध साहित्यिक कलावंत यांनी आपले आधार कार्ड लिंक बँक डिटेल्स, मोबाईल क्रमांक, कलेचा प्रकार इत्यादी माहिती सर्व गटविकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालयात लवकरात लवकर जमा करावी, जेणेकरुन या योजनेचा लाभ सर्व लाभार्थ्यापर्यंत पोहोचवणे सोयीचे होईल, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार यांनी केले आहे.
राजर्षि शाहू महाराज वृद्ध साहित्यिक कलावंत यांना मानधन देण्याची योजना सन १९५४-५५ पासून सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत राबवण्यात येते. जिल्हा स्तरावरील समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद व गटविकास अधिकारी यांच्या मार्फत या योजनेचे नियमन केले जाते. या योजनेअंतर्गत वृद्ध साहित्यिक व कलावंत व त्यांच्या वारसांना मानधन देण्यात येते.