Home क्राईम बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीला अटक करून बारा लाखाचा मुद्देमाल जप्त

बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीला अटक करून बारा लाखाचा मुद्देमाल जप्त

4 second read
0
0
126

no images were found

बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीला अटक करून बारा लाखाचा मुद्देमाल जप्त

कळे : कोल्हापूर गगनबावडा रोडवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी कारवाई करून बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीलाअटक केली आहे. त्यांच्याकडून संगणक, प्रिंटर व इतर साहित्यासह क्रेटा कार व मोबाईल असा एकूण १२,६२,४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे .
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकातील पोलीस अमंलदार विजय गुरखे यांना, पांढ-या रंगाची हुंडाई कंपनीची क्रेटा कार नं. एम.एच.०९ डी. एक्स. ८८८८ मधून बनावट नोटा घेवून काही इसम कळे-कोल्हापूर रोडने येणार असल्याची बातमी मिळाली. यानुसार पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांचे मार्गदर्शना प्रमाणे पोलीस उप निरीक्षक शेषराज मोरे, पोलीस अंमलदार विजय गुरखे, वैभव पाटील, सचिन देसाई, अनिल पास्ते, हिंदूराव केसरे, रणजित पाटील, दिपक घोरपडे, सोमराज पाटील व रफिक आवळकर यांच्या पथकाने कोल्हापूर – गगनबावडा जाणारे रोडवरील मरळी फाटा, ता. पन्हाळा येथे सापळा लावला.
क्रेटा कार आडवून कारमधील चंद्रशेखर बाळासाहेब पाटील ( वय ३४, रा. कसबा तारळे, ता. राधानगरी), अभिजीत राजेंद्र पवार (वय ४०, रा.गडमुडशिंगी, ता. करवीर), दिग्वीजय कृष्णात पाटील (वय २८, रा. जयभवानी तालमीसमोर, शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) यांची कारसह झडती घेतली. तसेच बनावट नोटा तयार करणारा संदिप बाळू कांबळे (वय ३८, रा. आंबेडकर नगर, कळे, ता. पन्हाळा) याचे घरामध्ये असे एकूण ४,४५,९००/- रुपये किमंतीच्या ५००/- व १००/- रुपयांच्या बनावट नोटा मिळून आल्या. बनावट नोटा तयार करण्याचे संगणक, प्रिंटर व इतर साहित्यासह क्रेटा कार व मोबाईल असा एकूण १२,६२,४८०/- रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून कळे पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …