no images were found
सहा महिन्यांत ‘कुमार कोश’चे दोन खंड प्रकाशित
विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वतीने ‘कुमार कोश’चे काम पूर्णत्वास आले असून, येत्या ६ महिन्यांमध्ये कोशाचे दोन्ही खंड प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहेत. त्याचप्रमाणे ‘बाल कोश’च्या निर्मितीचे नियोजन करण्यात आले असून विविध प्रकल्पांच्या कामासही गती देण्यात येईल. विश्वकोश निर्मिती मंडळाच्या विविध उपक्रमांसंदर्भात मंडळाचे अध्यक्ष डाॅ. राजा दीक्षित यांनी असे सांगितले की, त्यांनी आखलेल्या विविध योजना साकार करण्यासाठी निधी मिळेल. कुमार कोशाचे दोन खंड सहा महिन्यांत प्रकाशित होतील. हे काम पूर्णत्वास आणले आहे. बालकोशाचे नियोजन करण्यात आले आहे. ही सर्व कामे हाती घेऊन वेगाने करत राहणार असल्याचे दीक्षित यांनी सांगितले. मागे प्रशासनातील लोकांनी निधी अडवल्याच्या अडचणींमुळे बैठका आणि कार्यशाळांचे आयोजन करणे शक्य झाले नव्हते तसेच निधीअभावी योजनांवर काम करता आले नाही. त्या मुख्य तक्रारीला विश्व साहित्य संमेलनापासून डावलण्यात आल्याचे निमित्त मिळाले. मात्र, मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांनी लक्ष घालून मोकळेपणाने काम करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे कामकाजातील अडथळे दूर होतील, अशी आशा आहे. कुमार कोशाचे दोन खंड सहा महिन्यांत प्रकाशित होतील. हे काम पूर्णत्वास आणले आहे. कुमार कोशाचे दोन खंड सहा महिन्यांत प्रकाशित होतील. हे काम पूर्णत्वास आले आहे.