no images were found
शिक्षणशास्त्र अधिविभागात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती साजरी
कोल्हापूर (प्रतिनिधी): शिक्षणशास्त्र अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे गुरुवार दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. शिक्षणशास्त्र आधिविभागात दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. लोकमान्य टिळकांचे शालेय जीवन, स्वातंत्र्यलढ्यातील जहालमतवादी भूमिका व योगदान तसेच केशरी व मराठा या वृत्तपत्राची सुरुवात यावर (बी.एड एम.एड भाग-3) विद्यार्थी शिक्षिक अपराजिता कनोजिया व राहुल माने यांनी मते व्यक्त केले .तर ‘साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे’ यांचा जीवन परिचय, त्यांचे दलित साहित्यातील योगदान व कामगार चळवळीतील तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीतील कार्यांचा आढावा विद्यार्थी शिक्षिका (बी.एड एम.एड भाग-2) दीपिका रणशेवरे व ऐश्वर्या कदम यांनी घेतला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. रूपाली संकपाळ यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये महापुरुषांची जयंती व पुण्यतिथी साजरी करण्यामागील भूमिका स्पष्ट केली. भावी शिक्षकाने साहस, धैर्य, देशप्रेम, समता स्वातंत्र्य ही मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी महापुरुषांच्या कार्याचे स्मरण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केली. यावेळी आधीविभागातील शिक्षक डॉ. सुप्रिया पाटील, श्रीमती सरस्वती कांबळे ,बी.एड एम.एड [एकात्मिक] अभ्यासक्रमाचे सर्व विद्यार्थी तसेच एम.एड अभ्यासक्रमाचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुताई सुरकार यांनी केले.