Home राजकीय संतांबाबत वादग्रस्त पोस्ट टाकून तणाव निर्माण करणारा आरोपी निघाला हिंदू

संतांबाबत वादग्रस्त पोस्ट टाकून तणाव निर्माण करणारा आरोपी निघाला हिंदू

0 second read
0
0
194

no images were found

संतांबाबत वादग्रस्त पोस्ट टाकून तणाव निर्माण करणारा आरोपी निघाला हिंदू

वाशिम : जिल्ह्यातील शिरपूर जैन येथील एका तरुणानं संत सावता महाराज व माळी जातीबद्दल वादग्रस्त पोष्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्या होत्या. यामुळे शिरपूरसह वाशिम जिल्ह्यात तणाव निर्माण झाला होता. या घटनेत मुस्लिम समाजाला गृहीत धरून हिंदू संघटनांकडून रोष व्यक्त केला जात होता. मात्र पोलिसांनी आरोपी आरोपी मंगेश इंगोले याला अटक केली असून तो हिंदू आहे.

गेल्या चार दिवसांपासून या घटनेमुळे जिल्ह्यात तणाव असून सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी शिरपूर, मालेगांव, रिसोड ही शहरं कडकडीत बंद ठेवण्यात आली होती. आज वाशिम शहरही बंद ठेवण्यात आलं आहे. रिसोडमध्ये तर मोर्चाही काढण्यात आला. ही वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या आरोपीला शिरपूर पोलिसांनी अटक केली आहे. वैयक्तीक वादातून फेक अकाउंट बनवून अशी पोस्ट केल्याचं आरोपी मंगेश इंगोले यानं कबुली दिली
आहे. मात्र या तरुणाच्या वैयक्तीक वादामुळे जिल्ह्यात वातावरण तापलं होतं. अनेक हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या. सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात धार्मिक पोस्ट व्हायरल केल्या जात होत्या. मात्र, पोलिसांनी वेगाने तपास केल्याने सत्य परिस्थिती समोर आली आहे. तसंच पोलिसांनी आरोपीला अटकही केली आहे. यामुळे जिल्ह्यातील तणाव निवळण्यास मदत होणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सु…