no images were found
जिद्द चेस अकॅडमीच्या जलद बुद्धिबळ स्पर्धा
कोल्हापूरचा सोहम खासबारदार अजिंक्य जयसिंगपूरची दिशा पाटील उपविजेती तर कागलचा निहाल मुल्ला तृतीया
कोल्हापूर : सोमवार दिनांक 16 जानेवारी – रुक्मणी मल्टीपर्पज हॉल, फुलाची शिरोली, हायवे लगत,कोल्हापूर येथे जिद्द चेस अकॅडमीने आयोजित केलेल्या खुल्या सोळाशे गुणांकनाखालील जलद बुद्धिबळ स्पर्धेत चतुर्थ मानांकित कोल्हापूरच्या सोहम खासबारदारने नऊ पैकी साडेआठ गुण मिळवून अजिंक्यपद पटकाविले त्याला रोख दहा हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले.जयसिंगपूरच्या राष्ट्रीय बुद्धिबळपटू दिशा पाटील ने आठ गुणांसह उपविजेतेपद मिळविले तिला रोख 7000 रुपये व चषक देऊन सन्मानित केले तर या स्पर्धेतील अग्रमानांकित कागलच्या निहाल मुल्लाला साडेसात गुणासह तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले त्याला रोख 5000 व चषक बक्षीस म्हणून देण्यात आले.स्पर्धेचा बक्षीस समारंभ ग्राहक पंचायत च्या निवृत्त न्यायाधीश एडवोकेट श्रीमती वर्षा शिंदे,गोकुळ शिरगाव एमआयडीसी चे निवृत्त अधिकारी प्रभाकर चौगले, आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले,बुद्धिबळ प्रशिक्षक उत्कर्ष लोमटे व रुक्मणी मल्टीपर्पज हॉलचे मालक सचिन जगताप यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर संयोजक ऋतुराज भोकरे,निहाल मुल्ला, सुशांत कांबळे, तुषार शर्मा,अभिजीत चव्हाण उपस्थित होते.जयश्री पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले
इतर बक्षीस विजेते पुढील प्रमाणे
4) वरद पेठे,रत्नागिरी 5) अभिषेक पाटील मिरज 6) अथर्व चव्हाण कोल्हापूर 7) वरद आठल्ये 8) प्रदीप आवडे सातारा 9) शर्विल पाटील कोल्हापूर 10) संतोष सरीकर सांगली 11) शंकर साळुंके सोलापूर 12) संतोष रसाळ कोल्हापूर 13) वरद धाराशिवकर सातारा 14) सदानंद चोथे सांगली 15) ओंकार पाटील पुणे16) इम्रान बारस्कर शिरोली 17) अभिजीत कांबळे सांगली 18) विशाल पटवर्धन सोलापूर 19) शुभम कांबळे सातारा 20) प्रथमेश लोटके कोल्हापूर 21) स्वरूप जोशी कागल 22) दीपक कांबळे कोल्हापूर 23) श्रीकांत मुचंडीकर पुणे 24) पियुष माने सांगली 25) प्रज्वल मुधाळे हुपरी
उत्कृष्ट ज्येष्ठ बुद्धिबळपटू (साठ वर्षावरील) 1) राजू सोनेचा सांगली 2) बी.एस. नाईकक कोल्हापूर, उत्कृष्ट महिला बुद्धिबळपटू 1) शर्वरी कबनूरकर कोल्हापूर 2) तृप्ती प्रभू कोल्हापूर, उत्कृष्ट बिगर गुणांकन प्राप्त बुद्धिबळपटू- 1)स्वरूप साळवे गडहिंग्लज 2)प्रीतम घोडके कोल्हापूर, उत्कृष्ट बाराशे गुणांकनाखालील बुद्धिबळपटू, 1)विवान सोनी इचलकरंजी 2)प्रथमेश काशीद पुणे,
उत्कृष्ट चौदाशे गुणांकनाखालील बुद्धिबळपटू – 1)ऋषिकेश कबनूरकर कोल्हापूर 2)हर्षल पाटील पुणे. सात वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू- 1)दिविज कत्रुट कोल्हापूर 2)शिवांश धायगुडे पुणे 3)शर्विल पेटकर कोल्हापूर, दहा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू- 1)रियार्थ पोद्दार इचलकरंजी 2)शौर्य बगाडिया इचलकरंजी 3)प्रेम निचल कागल. बारा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू- 1)आदित्य चव्हाण सांगली 2)अभय भोसले जांभळी 3) अरिना मोदी कोल्हापूर. चौदा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू- 1)व्यंकटेश खाडे-पाटील कोल्हापूर 2)राजस डहाळे बेळगाव 3)ईश्वरी जगदाळे सांगली
सोळा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू- 1)आदित्य कोळी सांगली 2)हर्ष शेट्टी सांगली 3)साद बारस्कर शिरोली. उत्कृष्ट अकॅडमी- 1)एमडी चेस अकॅडमी,कोल्हापूर 2)केपी चेस अकॅडमी, सांगली 3) व्हेटेक्स चेस अकॅडमी,वारणानगर.