Home राजकीय नाना पटोलेंना हटवा! आशिष देशमुख यांचे काँग्रेस अध्यक्ष खर्गेंना पत्र

नाना पटोलेंना हटवा! आशिष देशमुख यांचे काँग्रेस अध्यक्ष खर्गेंना पत्र

0 second read
0
0
115

no images were found

नाना पटोलेंना हटवा! आशिष देशमुख यांचे काँग्रेस अध्यक्ष खर्गेंना पत्र

नवी दिल्ली : काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी थेट काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहून नाना पटोले यांना पदावरुन हटवण्याची मागणी केली आहे.
देशमुख यांनी खर्गेंना लिहिलेल्या पत्रात म्हटलं की, नाना पटोले यांची जी कार्यशैली आहे त्यामुळं यापूर्वी विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता तो आता काँग्रेसच्या हातातून निसटत चालला आहे. आत्ताचीच निवडणूक नव्हे तर यापूर्वीच्या निवडणुकींचा दाखला देताना पक्षातील बेबंदशाही थांबली पाहिजे अशी मागणीच त्यांनी केली आहे. जर ही बेबंदशाही थांबली नाही तर शिंदे गटाच्याही मागे पडून काँग्रेस पाचव्या क्रमांकावर ढकलला जाईल, असंही देशमुख यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसनं सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. पण तांबे यांनी आपला मुलगा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्यासाठी आयत्यावेळी पक्षश्रेष्ठींशी कुठलीही चर्चा न करता उमेदवारी अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडं सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. याप्रकारामुळं काँग्रेसची नाचक्की झाली होती, कारण पक्षात शिस्तीचा अभाव असल्याचं यावरुन दिसून आलं होतं

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

सिध्दार्थनगर व मोरे माने नगर आरोग्य केंद्रांना राज्यस्तरीय गुणवत्ता प्रमाणपत्र

सिध्दार्थनगर व मोरे माने नगर आरोग्य केंद्रांना राज्यस्तरीय गुणवत्ता प्रमाणपत्र : राष्ट्रीय…