no images were found
जेईई मेन परीक्षेचे हॉल तिकीट लवकरच उपलब्ध
जेईई मेन परीक्षेचे हॉल तिकीट jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. हॉल तिकीट उपलब्ध करण्यापुर्वी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) कडून ‘एक्झाम सिटी स्लिप’ उपलब्ध करण्यात येणार आहे कि, ज्यामुळे विद्यार्थ्यांना आपली परीक्षा कोणत्या शहरात आहे याची माहिती त्वरित उपलब्ध होईल. यामुळे विद्यार्थ्यांना पुढील नियोजनास मदत होईल.
नेहमी या परीक्षांच्या तीन-चार दिवस अगोदर हॉल तिकीट उपलब्ध करून दिले जाते. त्यानुसार यावर्षी जेईई मेन परीक्षेचे हॉल तिकीट २० जानेवारी २०२३ किंवा २१ जानेवारी २०२३ ला उपलब्ध होण्याची शक्यता आहे. जे विद्यार्थी जेईई मेन परीक्षा उत्तीर्ण होऊन २.५ लाख रँकमध्ये असतील ते जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरतील. जेईई ऍडव्हान्स परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया ३० एप्रिलपासून सुरू होणार असून ही परीक्षा ४ जून रोजी होईल.