no images were found
पापाची तिकटी येथील मुन्ना व राजू पतंग डेपोकडून मांजा व नॉयलॉन, सिंथेटिक धाग्याच्या 12 रिंग्या जप्त
कोल्हापूर : पान लाईन, पापाची तिकटी येथे सुरु असलेल्या मुन्ना पतंग डेपो व राजू पतंग डेपो यांनी नॉयलॉन, सिंथेटिक धागासाठा व विक्री करत असलेचे आढळून आले. या व्यावसायिकांवर परवाना विभाग व आरोग्य विभागामार्फत संयुक्तरित्या कारवाई करण्यात येऊन मांजा व नॉयलॉन /सिंथेटिक धाग्याच्या 12 रिंग्या जप्त करण्यात आल्या. उप-आयुक्त शिल्पा दरेकर, परवाना अधिक्षक रामचंद्र काटकर व मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हि कारवाई करण्यात आली. संबंधित व्यावसायिकांचा परवाना निलंबित करण्याची कार्यवाही परवाना विभागाकडून प्रस्तावित करण्यात येत आहे. सदरची कारवाईआरोग्य निरीक्षक मनोज लोट, परवाना निरीक्षक बाळासाहेब जाधव, शकील पठाण यांनी केली.
मा.उच्च न्यायालय, मुंबई यांचे औरंगाबाद खंडपीठाकडील जनहित याचिका क्र.08/2020 मध्ये दि.20 डिसेंबर 2022 ने नायलॉन मांजा खरेदी, विक्री, वापर व वाहतुकीवर निर्बंध आणणेबाबत आदेश दिलेले आहेत. त्याअनुषंगाने प्रभारी जिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी महापालिका स्तरावर पथक कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महापालिकेच्यावतीने तीन पथके तयार केली आहेत. या पथकामार्फत शहरांतर्गत नॉयलॉन, सिंथेटिक धागासाठा व विक्री करत असलेल्या व्यावसायिकांची तपासणी करण्यात येत आहे.