
no images were found
‘माझी आजवरची सर्व गाणी आणि संगीत यामागील उद्देश माझी पत्नी संगीता’ – शंकर महादेवन
‘झी टीव्ही’वर सुरू असलेला ‘सा रे ग म प’ हा सर्वाधिक काळ सुरू असलेला गायन क्षेत्राशी संबंधित रिअॅलिटी कार्यक्रम असून गेली तीन दशके त्याने आपली मोहिनी प्रेक्षकांच्या मनावर घातली आहे. या कार्यक्रमात एक स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या श्रेया घोषाल, शेखर रविजानी, कुणाल गांजावाला, सुगंधा मिश्रा, कमाल खान, राजा हसन, वैशाली माडे वगैरे अनेकांनी नामवंत गायक-संगीतकार म्हणून आपली यशस्वी कारकीर्द उभी केली आहे. आता ‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’च्या नवव्या आवृत्तीत या सर्वात प्रतिष्ठेच्या व्यासपिठावर काही गुणी बालगायकांना ‘झी टीव्ही’ वाहिनी आपली कला सादर करण्याची संधी देत आहे. या कार्यक्रमाचे नवे परीक्षक म्हणून नामवंत संगीतकार शंकर महादेवन, अनु मलिक आणि नीति मोहन हे काम पाहत असून भारती सिंग ही कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत सर्वांचे मनोरंजन करत आहे.
आपल्या अफलातून गायनकलेमुळे यातील टॉपच्या सहा स्पर्धकांची नावे आता घरोघरी पोहोचली आहेत. येत्या वीकेण्डच्या ‘फॅमिली स्पेशल’ या विशेष भागात सर्व स्पर्धकांचे कुटुंबीय सहभागी होणार असल्याने हा भाग प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरेल. सर्वच स्पर्धकांच्या कुटुंबियांनी या भागात उपस्थित राहून आणि आपल्या पाल्याची माहिती देऊन त्यांना सुखद आश्चर्याचा धक्का दिला. यावेळी परीक्षक शंकर महादेवन यांनीही आपली पत्नी संगीता आणि कुटुंबियांशी असलेल्या आपल्या खास नात्याची माहिती दिली. या महान संगीतकाराने सांगितले की आपली आजवरची सर्व गाणी आणि संगीतामागील उद्देश आपली पत्नी संगीता हीच आहे आणि त्यांनी आपली ही सांगितिक वाटचाल पत्नीला अर्पण केली.
शंकर महादेवन यांच्या जीवनकथेने तुमचे हृदय द्रवले असले, तरी इतर स्पर्धक आपल्या कुटुंबियांची भेट कशी घेतात, त्याची प्रतीक्षा करा.