
no images were found
महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी कळंबा मध्यवर्ती कारागृहाचे तुरुंगाधिकारी गजाआड
कोल्हापूर : लग्नाच्या आमिषाने महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी योगेश भास्कर पाटील (रा. कळंबा क्वार्टर्स) याला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली आहे. संशयित पाटील हा कळंबा मध्यवर्ती कारागृहाचे वर्ग-1 अधिकारी असून, पीडितेला जातीवाचक शिवीगाळ केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. संशयिताला अटक करून न्यायालयात हजर केले असता १३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
संशयित योगेश पाटील कळंबा मध्यवर्ती कारागृहात तुरुंगाधिकारी म्हणून कार्यरत आहे. पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून डिसेंबर २०२१ पासून त्याने शारीरिक संबंध ठेवले होते. परंतु, संशयिताकडून वारंवार त्रास होऊ लागल्याने पीडितेने त्याला नकार दिला. यातून चिडून त्याने पीडितेला जातीवाचक शिवीगाळ करून हिणवण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी याच कारणातून संशयित पाटील याने पीडित महिलेला मारहाण करत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.या प्रकरणी पीडित महिलेने जुनाराजवाडा पोलिसात फिर्याद दिली त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली.