no images were found
कोल्हापूर रेल्वे स्टेशनवर बॉम्ब..? प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण, तथापि हा तर एटीएसचा मॉक ड्रिलचा प्रकार
कोल्हापूर : येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनसमध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरल्याने रेल्वे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला होता. बॉम्बचा शोध घेण्यासाठी बॉम्बशोधक पथक आणि मोठ्याप्रमाणावर पोलीस, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले होते. संपूर्ण रेल्वे स्टेशन मोकळे करण्यात आले .परंतु रेल्वे स्टेशनवर बॉम्ब हे मॉक ड्रिल असल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
एटीएसने मॉक ड्रिल केल्याची माहिती समोर येत आहे परंतु बॉम्बचा तपास करण्यासाठी संपूर्ण रेल्वे स्टेशन मोकळे करण्यात आले आहे. यावेळी शहर पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण यांच्यासह पोलीस फौज फाटा रेल्वे स्टेशनवर दाखल होता. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.