
no images were found
कॉंग्रेस नेते जयप्रकाश छाजेड यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
मंगळवारी रात्री जयप्रकाश छाजेड (वय ७५) यांचे हृदयविकाराने निधन झाले. नागपूर येथे बैठकीला निघालेले असतानाच माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना नाशिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मंगळवारी रात्री जयप्रकाश छाजेड हे नागपूर येथे काँग्रेस पक्षाच्या बैठकीसाठी जाण्यासाठी चालले असताना यांना हृदयविकाराचा झटका आला. नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे छाजेड यांच्या कुटुंबियांनी त्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर छाजेड नागपूरला बैठकीसाठी निघाले होते. परंतु त्यापूर्वीच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारांदरम्यान जयप्रकाश छाजेड यांचा मृत्यू झाला. छाजेड यांच्या निधनाचे वृत्त समजताच नागपूरला बैठकीसाठी गेलेले कॉंग्रेस कार्यकर्ते नाशिकला परतले. बुधवारी (आज) नाशिकच्या काँग्रेस भवनात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
जयप्रकाश छाजेड महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. पुढील काळात जयप्रकाश छाजेड कॉंग्रेसच्या नाशिक शहर आणि राज्य पातळीवरील अनेक महत्त्वाच्या पदी विराजमान झाले. जयप्रकाश छाजेड हे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे निकटचे सहकारी होते. त्याचदरम्यान छाजेड यांची विधानपरिषदेवर आमदार म्हणून नियुक्तीही झाली होती. बुधवारी सायंकाळी ६.०० वाजता नाशिकच्या अमरधाममध्ये छाजेड यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.