Home क्राईम हिंगोलीत ३० प्रवाशांसह बस उलटून अपघात

हिंगोलीत ३० प्रवाशांसह बस उलटून अपघात

3 second read
0
0
41

no images were found

हिंगोलीत ३० प्रवाशांसह बस उलटून अपघात

हिंगोलीः हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील बोरी सावंत फाट्यावर (औंढा नागनाथ ते हट्टा मार्ग) बोरीसावंत शिवार येथे एसटी महामंडळाची बस उलटून झालेल्या अपघातात २५ ते ३० प्रवासी जखमी झाले आहेत. मंगळवारी ता. १० पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. घटनास्थळी पोलीस तातडीने हजर झाले तसेच त्यांनी  जखमींना उपचारासाठी हट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आंबाजोगाई आगाराची चंद्रपूर-अंबाजोगाई (क्र.एमएच-०९-एफएल-१०२०) ही बस आज सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास औंढा नागनाथ ते हट्टा मार्गावर बोरीसावंत शिवारात आली असतानाच समोरून येणाऱ्या ट्रक चालकाने बसला साधारण धक्का दिला. यामध्ये ट्रकची बसला धडक बसू नये यासाठी चालकाने प्रवाशांना वाचविण्यासाठी बस बाजूला घेण्याच्या प्रयत्नात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून बस रस्त्याच्या बाजूला खाली जाऊन उलटली. या अपघातामुळे प्रवाशांमधून गदारोळ मजला. याच दरम्यान या अपघाताची माहिती एका कारचालकाने रिपाईचे पदाधिकारी किरण घोंगडे यांना दिली. त्यांनी तातडीने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन हट्टा पोलिसांना कळविले. हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे, जमादार शेषराव लाखाडे, सय्यद खतीब, राजेश ठाकूर, आंबादास बेले यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन गावकऱ्यांच्या मदतीने जखमी प्रवाशांना बस बाहेर काढले.

या अपघातामध्ये सुमारे २५ ते ३० प्रवाशी जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील अनेक प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून जखमी प्रवाशांना तातडीने उपचारासाठी वाहनाने हट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलेले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…