
no images were found
विद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धेमध्ये महिला गटात यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय तर पुरुष गटात नाईट कॉलेज आर्ट्स अँड कॉमर्सला अजिंक्यपद
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ आयोजित शाहू महाराज छत्रपती यांच्या अमृत महोत्सव वाढदिवसानिमित्त विद्यापीठ स्तरीय बास्केटबॉल पुरुष व महिला स्पर्धेचे आयोजन क्रीडा महर्षी मेघनाथ क्रीडा संकुल मध्ये आयोजित करण्यात आले. या स्पर्धेमध्ये सांगली सातारा कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यांमधून आठ मुलांचे व सहा मुलींचे संघाने सहभाग घेतला. अत्यंत चुरशीच्या सामन्यांमध्ये महिलांच्या गटामध्ये प्रथम क्रमांक यशवंतराव चव्हाण महाविद्यालय वारणा, द्वितीय क्रमांक कन्या महाविद्यालय मिरज आणि तृतीय क्रमांक दत्ताजीराव कदम आर्ट्स कॉमर्स सायन्स महाविद्यालय इचलकरंजी यांनी पटकाविला. पुरुषांचा सामन्यामध्ये नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स प्रथम क्रमांक देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स द्वितीय क्रमांक आणि यशवंतराव चव्हाण महाविद्यालय वारणा याने तृतीय क्रमांक पटकाविला.
स्पर्धेचे बक्षीस समारंभ शिवाजी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ विलास शिंदे, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ शरद बनसोडे, डॉ. एन. डी. पाटील, प्रा बापूसाहेब सरगर, प्रा. किरण पाटील प्रा. निलेश पाटील उपस्थित होते. स्पर्धेचे संयोजन पृथ्वीराज सरनाईक, केदार सुतार, अमित दलाल, उदय पाटील, विनायक साळुंखे, विजय इंगवले, विजय कांबळे धीरज पाटील, सुनील देसाई, आनंदा तळेकर यांनी केले.