
no images were found
भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे माजी अध्यक्ष आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे आज प्रदीर्घ आजाराने देहावसान झाले. कित्येक महिन्यापासून ते आजारी होते. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान तब्बेतीत सुधारणा झाल्यावर विधान परिषद निवडणुकीसाठी जगताप मुंबईला मतदानासाठी गेले होते.
काॅंग्रेस पक्षापासून लक्ष्मण जगताप यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. १९९२ मध्ये ते नगरसेवकपदी निवडून आले. १९९७ च्या निवडणुकीतही ते निवडून आले. १९९३-९४मध्ये ते महापालिका स्थायी समितीचे सभापती पद भूषविले. १९९८ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला. १९ डिसेंबर २००० ते १३ मार्च २००२ या कालावधीत त्यांनी पिंपरी-चिंचवड महापौरपद भुषविले. विधान परिषद निवडणुक अपक्ष लढवून विजय मिळवला. आज दीर्घ आजाराने लक्ष्मण जगताप यांनी जगाचा निरोप घेतला.