no images were found
भाजपतर्फे अजित पवार यांचा निषेध
सांगली (रेखा दामुगडे) : आज मारुती चौकात भारतीय जनता पार्टी यांचे वतीने राष्ट्रवादीचे नेते व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते मा. आ. अजितदादा पवार यांनी, विधानसभा हिवाळी अधिवेशनात धर्मवीर संभाजी महाराज यांचे बद्दल अवमानास्पद काढलेल्या विधानाचा निषेध करणेत आला.
भाजपा प्रदेश सचिव पै पृथ्वीराज पवार (भैय्या )म्हणाले, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते.हे अजित दादांचे विधानभवनातील वक्तव्य म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांवर अनन्वीत अत्याचार करून हत्या करणाऱ्या औरंगजेबाला धर्मनिरपेक्ष ठरवत, त्याचे ते क्रूर कृत्य पवित्र करण्याचा हा प्रकार आहे. शरद पवार व अजित पवार हे काका पुतणे सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासाची सोयीस्कर मोड़तोड़ करुन विशिष्ठ समाजाचे लांगुल चालन करीत आपले राजकीय मनसुबे साध्य करू पाहत आहेत… छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराज तसेच स्वराज्यासाठी ज्यांनी आपल्या सर्वस्वाची आहुती दिली त्या मराठा सैन्याची व तमाम शिवभक्तांचा अवमान ते करीत आहेत ..
शरद पवार म्हणतात, शिवाजी महाराज जाणते राजे नव्हते तर राष्ट्रवादीचे नेते म्हणतात की शरद पवार हेच जाणते राजा आहेत. ओवेसी औरंगजेबाच्या कबरीला साष्टांग नमन करून स्वराज्यावर चालून आलेल्या राक्षसी प्रवृत्तीच्या अफजलखानाच्या कबरीचे गेली 40 दर्ग्यात रूपांतर झाले तसेच विशाळगड़ व स्वराज्यातील 65 किल्यांवर आता उरूस भरत आहेत. या सगळ्यांना सत्तेत बसून या काका पुतण्यांनीच पाठबळ दिले. मतांच्या राजकारणाठी चाललेला हा प्रकार समस्त शिवभक्त आता खपवून घेणार नाहीत.हा प्रकार असंच जर चालू राहीला तर राष्ट्रवादीच्या नेत्यांना शिवभक्त रस्त्यावर अडवून जाब विचारतील.
या कार्यक्रमास प्रशांत चिपळूणकर, महादेव शेडगे, अभिमन्यु भोसले, रविंद्र वादवणे, उदय मुळे, नगरसेविका स्वाती ताई शिंदे,नगरसेवक पै. युवराज बावड़ेकर, पै. सुबराव मद्रासी, निलेश हिंगमीरे, प्रदीप कांबळे, सौ. वसगडेकर ताई, नगरसेविका उर्मिला बेलवलकर,विशाल वरे, अमोल गवळी, सुहास कलगटगी, रेखा पाटील, गंगा तिड़के, नगरसेविका ढोपे पाटील मैडम , आरती ऐनापुरे, अजयकुमार वाले, राजकुमार बिरनाळे, रेखा सरनोबत,सतिश जाधव, संदीप जाधव, आदि सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.