Home क्राईम तीन अपघातांत महिलेसह शाळकरी मुलगा ठार

तीन अपघातांत महिलेसह शाळकरी मुलगा ठार

2 second read
0
0
205

no images were found

तीन अपघातांत महिलेसह शाळकरी मुलगा ठार

कोल्हापूर : रंकाळा टॉवर, फुलेवाडी रिंगरोडसह केर्ली अशा तीन ठिकाणी शनिवारी झालेल्या अपघातांत महिलेसह शाळकरी मुलगा ठार, तर तिघेजण जखमी झाले. अनुराधा मिलिंद पोतदार (वय ४० , रा.शेळके कॉलनी, फुलेवाडी) व लक्ष्मण धुळू डोईफोडे (१४, गंधर्वनगरी, फुलेवाडी, रिंगरोड) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. तर मिलिंद पोतदार (४५ ), नीलेश दामोदर माने (३७, नाचणी, जि. रत्नागिरी) यांच्यासह तिघांचा जखमींमध्ये समावेश आहे.
फुलेवाडी रिंगरोड येथील मिलिंद पोतदार हे पत्नी अनुराधा यांच्यासमवेत सकाळी दुचाकीवरून कोल्हापूरकडे येत होते. पत्नी खासगी रुग्णालयात नोकरीला असल्याने त्यांना कामाच्या ठिकाणी सोडून पती मिलिंद आपल्या कामाच्या ठिकाणी जाणार होते. रंकाळा टॉवर-जावळाचा गणपती मंदिरदरम्यान रोडवर जेसीबी मशिनच्या बकेटचा दुचाकीला जोरात धक्का लागल्याने पोतदार दाम्पत्य जमिनीवर कोसळले. त्यात दोघेही जखमी झाले. डोक्याला जोराचा मार लागल्याने अनुराधा गंभीर जखमी झाल्या. अतिरक्तस्त्रावामुळे त्यांची प्रकृती गंभीर बनली. त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, फुलेवाडी रिंगरोड परिसरात गंधर्वनगरी येथील लक्ष्मण धुळू डोईफोडे (वय १४) हा मुलगा दूध आणण्यासाठी दुचाकीवरून जात होता. गंधर्वनगरी स्वागत कमानीजवळ दुचाकींची समोरासमोर धडक झाली. त्यात गंभीर जखमी झालेल्या लक्ष्मणचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. डोईफोडे कुटुंबीय मूळचे ऐनी (ता. राधानगरी) येथील असून, फुलेवाडी परिसरात त्यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे.लक्ष्मण नववीच्या वर्गात शिक्षण घेत होता. हाता-तोंडाला आलेल्या मुलाचा मृत्यू झाल्याने कुटुंबाला धक्का बसला. अपघातातील अन्य एका जखमीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर केर्ली ( ता. करवीर) येथे मोटारीची धडक बसून नीलेश दामोदर माने हा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. दुपारी चार वाजता ही घटना घडली. जखमीला रुग्णालयात दाखल केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…