
no images were found
पापाची तिकटी ते माळकर तिकटी 18 लाखाचा रस्ता मंजूर
कोल्हापूर : शहरातील पापाची तिकटी पानलाईन ते माळकर तिकटी मुख्य रस्त्यावर 18 लाखाच्या पेव्हर पध्दतीच्या डांबरी कामास प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांची मंजूरी झाली आहे. त्याप्रमाणे दि.1 जानेवारी 2023 रोज हे काम सुरु करण्यात आले आहे. सदरचे रस्तेवर दिवसा रहदारी असल्याने रात्रौ हे काम करण्यात येत आहे. सदरचे काम संगीता कन्स्ट्रक्शन यांच्या नांवे मंजूर असून यासाठी 18 लाख इतका खर्च करण्यात येणार आहे. त्याचबरोबर विभागीय कार्यालय क्रमांक 2 अंतर्गत बहुतांशी मुख्य रस्ते डांबरी करण पुर्ण करण्यात आले आहे. सदरचे काम उपशहर अभियंता नारायण भोसले, कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले, सागर शिंदे, निवास पवार यांच्या देखरेखी खाली करण्यात येत आहे.