Home क्राईम लग्नास नकार दिला म्हणून वाटेतच अडवून तरुणीवर चाकूहल्ला; तरुण अटकेत

लग्नास नकार दिला म्हणून वाटेतच अडवून तरुणीवर चाकूहल्ला; तरुण अटकेत

0 second read
0
0
28

no images were found

लग्नास नकार दिला म्हणून वाटेतच अडवून तरुणीवर चाकूहल्ला; तरुण अटकेत

मुंबई : येथील दिंडोशी परिसरात लग्नास नकार दिला म्हणून २४ वर्षीय तरुणीवर प्रियकराने चाकू हल्ला केला आहे. त्यामुळे तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गुरूवार दि. २९ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेनं परिसरातून संतापाची लाट उसळली आहे.
मिशा उंडारे (वय २४) असे जखमी तरुणीचे नाव आहे. प्रमिशा हिच्यावर मुंबईतील शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून दिंडोशी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटकही केली आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव राजेंद्र परब असं आहे. पीडित तरुणी व आरोपी एकाच परिसरात राहतात. दोघांमध्ये पूर्वी मैत्रीपूर्ण संबंध होते. काही दिवसांनी त्यांच्या मैत्रीत दुरावा आला. प्रमिशा आपल्यासोबत बोलत नसल्याने राजेंद्र याला राग अनावर झाला होता. तो प्रमिशाकडे वारंवार बोलण्याची तसेच लग्नाची मागणी घालत होता. मात्र, प्रमिशा त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती. दरम्यान, गुरूवारी सायंकाळच्या सुमारास प्रमिशा ही बोरिवली येथून कामावरून घरी परतत होती.
दुर्गावाडी चाळ, देवीपाडा नॅशनल पार्कजवळ प्रमिशा आली असता, आरोपी राजेंद्र याने तिची वाट अडवली. त्यावेळी आरोपी राजेद्र परब याने तिच्याकडे लग्नाची मागणी घातली. प्रमिशाने त्यास नकार दिल्याने आरोपीने तिच्या गळ्यावर व हातावर चाकूने वार केले. त्यामुळे प्रमिशा गंभीरित्या जखमी झाली. तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रमिशाने दिलेल्या तक्रारीवरून दिंडोशी पोलिसांनी आरोपी राजेंद्र विरोधात विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला अटकही केली आहे. या घटनेनं परिसरातून संतापाची लाट उसळली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

आ. राजेश क्षीरसागर यांना मंत्रिपद मिळण्यासाठी अंबाबाईला साकड

 आ. राजेश क्षीरसागर यांना मंत्रिपद मिळण्यासाठी अंबाबाईला साकड       &n…