
no images were found
टाटा कॅपिटलकडून ‘जलआधार’ उपक्रमाच्या साहाय्याने ६००० हेक्टर जमिनीला पुनरुज्जीवन बहाल
महाराष्ट्र आणि तामिळनाडूमधील उपचारित क्षेत्रांमध्ये भूजल स्तरांमध्ये २ मीटर वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे
मुंबई/चेन्नई : टाटा ग्रुपमधील आर्थिक सेवा कंपनी टाटा कॅपिटलने ग्रामीण महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये जलआधार हा पाणलोट विकास प्रकल्प सुरु केला आहे. भूजल संसाधनांमध्ये वाढ करून सिंचनासाठी तसेच पिण्यासाठी स्वच्छ पाणी पुरवले जावे, पाण्याचा वापर अधिक कार्यक्षमतेने केला जावा आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ व्हावी हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या उपक्रमामुळे या दोन राज्यांमधील २२ गावांना त्यांचे जलसाठे पुनरुज्जीवित करून आणि झोन रिचार्ज करून जल पातळी पूर्ववत स्थितीत आणण्यात मदत झाली आहे. यामुळे भूजल पातळीमध्ये १ ते २ मीटरची वाढ झाली आहे. या गावांनी शेतीच्या पर्यावरणानुकूल पद्धती अवलंबिल्यामुळे तेथील पाणी समस्या नियंत्रणात आली आहे आणि त्याठिकाणी आता दीर्घकाळपर्यंत पाणी मिळत राहू शकते. या उपक्रमामार्फत पुढील ३ वर्षात अजून ६००० हेक्टर जमीन पूर्ववत स्थितीत आणण्याची योजना आहे.
महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये २०१६-१७ पासून जलआधार प्रकल्पाने निर्माण केलेला प्रभाव- * ६००० हेक्टर क्षेत्र उपचारित * २२ गावांना उपक्रमात सहभागी करवून घेण्यात आले असून १५००० पेक्षा जास्त शेतकऱ्यांवर त्याचा प्रभाव पडला आहे. * ४१०० लाख लिटर जल साठवण क्षमता निर्माण करण्यात आली आहे. * विविध प्रकारची पिके घेऊ लागल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये प्रति पीक १९,००० रुपयांची सरासरी वाढ झाली आहे.
टाटा कॅपिटलचे एसव्हीपी सीएसआर श्री. श्रीधर सारथी यांनी टाटा कॅपिटलच्या सीएसआर उपक्रमांविषयी सांगितले, “गेल्या अनेक वर्षात जलआधारचे जे परिणाम दिसून आले आहेत त्याचा टाटा कॅपिटलला अतिशय अभिमान वाटतो. हे आमच्या शाश्वत विकास उद्दिष्टांना अनुसरून असून एकात्मिक जल संसाधन व्यवस्थापन व पाणी वापराच्या कार्यक्षमतेवर यामध्ये भर दिला जातो. या उपक्रमाने संपूर्ण इकोसिस्टिममध्ये जे परिवर्तन घडवून आणले आहे ते आम्ही पाहिलेले आहे, त्यामुळे जल संवर्धनाचे व्यापक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून स्थानिक समुदायांवर प्रभाव निर्माण करण्याची आमची वचनबद्धता आम्ही कायम सुरु ठेवू.”