no images were found
पानसरे खून खटल्यावर २३ ऑगस्टला सुनावणी
कोल्हापूर : गोविंद पानसरे खून खटल्यावर पुढील सुनावणी २३ ऑगस्टला होणार आहे. डॉ. वीरेंद्र तावडेसह १० आरोपींना कोर्टात हजर केले जाणार आहेत. यावेळी आरोपीवर दोष निश्चिती केली जाणार असून सरकार पक्षामार्फत विशेष सरकारी वकील अॅड. शिवाजीराव राणे आणि आरोपीच्या वतीने अॅड समीर पटवर्धन काम पाहणार आहेत. ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथककडे (एटीएस) सोपण्यात यावा, असा आदेश ३ ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणाचा तपास करणार्या ‘एसआयटी’च्या अधिकार्यांनीही ‘एटीएस’ला तपासकार्यात सहकार्य करावे, असेही न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले आहे.