
no images were found
डाक विभागामार्फत ‘हर घर तिरंगा’ मोहीम
कोल्हापूर : डाक विभागामार्फत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच डाक कार्यालयामधून ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबविण्यात येत आहे. सदर वर्ष हे आजादी का अमृत महोत्सव म्हणून साजरे करण्यात येत असून या अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ मोहिमेद्वारे प्रत्येक घरी तिरंगा उभारण्याचे आवाहन केंद्र सरकार मार्फत केले आहे यासाठी डाक विभागामार्फत तिरंगा विक्री सुरु करण्यात आली आहे.
विक्रीसाठी उपलब्ध तिरंगा हा २*३ आकाराचा असून त्याची किंमत रु. २५ इतकी आहे. आज अखेर कोल्हापूर विभागातील सर्वच म्हणजे ३ हेड पोस्त ऑफिस, ९३ सब पोस्त आणि ४६८ शाखा पोस्त ऑफिस मार्फत तिरंग्याची विक्री सुरु आहे. सदर मोहिमेच्या प्रचारासाठी प्रभात फेरी, शाळांना तसेच स्थानिक स्वराज्य संस्थाना भेटी देणे इ. उपक्रम डाक विभागामार्फत सुरु आहेत. तरी सर्व नागरिकांनी पोस्त ऑफिसमधून तिरंगा विकत घेऊन सदर मोहीम यशस्वी करावी असे आवाहन श्री. अर्जुन इंगळे, अधीक्षक, डाकघर कोल्हापूर विभाग यांनी केले आहे.