no images were found
‘इंडिगो’ तर्फे कोल्हापूरहून कनेक्टींग फ्लाईटद्वारे देशातील प्रमुख शहरांना विमान सेवा
कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळावरून इंडिगो एअरलाईन्स तर्फे देशातील प्रमुख शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू होणार आहे. त्यामुळे कोल्हापूर विमानतळावर येणार्या प्रवाशांना मोठी सुविधा मिळणार आहे. कोल्हापूर- अहमदाबाद, कोल्हापूर – हैद्राबाद, कोल्हापूर – बेंगलुरू आणि कोल्हापूर- तिरूपती या चार मार्गावर थेट विमानसेवा इंडिगो एअरलाईन्स तर्फे दिली जात आहे.
१३ जानेवारीपासून कोल्हापूर ते बेंगलुरू आणि पुढे कोईमतुर ही विमान सेवा सुरू होत आहे. त्याशिवाय कोल्हापूर पासून देशातील काही प्रमुख देशांसाठी कनेक्टींग फ्लाईट उपलब्ध आहेत. त्यानुसार भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, कोईमतुर, दिल्ली, गुवाहाटी, इंदोर, जयपूर, कोची, कोलकत्ता, लखनौ, मंगलूरू, मुंबई, तिरूअंनतपुरम, त्रिचीरापल्ली आणि विशाखापट्टणम या शहरांसाठी, इंडिगो एअरलाईन्सच्या कनेक्टींग फ्लाईटस् प्रवाशांना उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे कोल्हापूर विमानतळावर चेक इन केल्यानंतर, त्यांना प्रवासाच्या अंतिम ठिकाणापर्यंतचा बोर्डींग पास मिळेल आणि प्रवाशांचे बॅगेजही परस्पर दुसर्या विमानात चढवले जाईल. अंतिम गंतव्य स्थानावर प्रवाशांना त्यांचे बॅगेज आणि लगेज मिळेल. त्यामुळे कोल्हापूर विमानतळावरून प्रवास करणार्यांची हवाई सफर अधिक सुखकर आणि सुलभ होणार आहे.
कोल्हापुरातून देशातील २० प्रमुख शहरांमध्ये इंडिगो एअरलाईन्सनं थेट किंवा अन्य शहरांमार्गे आणि कनेक्टींग फ्लाईटद्वारे प्रवासी सेवा उपलब्ध केली आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि मानसिक त्रास कमी होणार आहे. आणि ही मोठी पर्वणीच उघोग विश्वा साठी ठरणार आहे . दुसरीकडे विधानसभेतही या विधानाचे पडसाद उमटले. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या मुद्द्याकडे राज्य सरकारचं लक्ष वेधलं. तसेच या विधानाचं निषेध करण्याचं पत्रं कर्नाटक सरकार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पाठवण्याची मागणी अजितदादांनी केली. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र-कर्नाटकातील सीमावाद प्रलंबित आहे. तरीही याच मुद्द्यावरून स्वत: कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांकडून वारंवार चिथावणीखोर विधान केली जात असल्याने हे प्रकरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कोर्टात गेलं. यावेळी अमित शाह यांनी कर्नाटकातील मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीत बोलावून त्यांना या मुद्द्यावर काहीही न बोलण्याची तंबी दिली. मात्र, त्यानंतरही कर्नाटकातील नेत्यांच्या कुरापती सुरूच आहेत.