Home Uncategorized आगामी मालिका ‘ध्रुव तारा-समय सदी से परे’ मध्‍ये रिया शर्मा

आगामी मालिका ‘ध्रुव तारा-समय सदी से परे’ मध्‍ये रिया शर्मा

52 second read
0
0
31

no images were found

आगामी मालिका ध्रुव तारासमय सदी से परे मध्‍ये रिया शर्मा

आगामी मालिका ध्रुव तारासमय सदी से परेमध्‍ये रिया शर्मा १७व्‍या शतकातील राजकुमारीच्‍या भूमिकेत

प्रेम दोन व्‍यक्‍तींना काळाच्‍या सीमांना झुगारून एकत्र आणते तेव्‍हा काय घडते? या आधारावर सोनी सबवरील आगामी मालिका टेलिव्हिजनवरील अभूतपूर्व प्रेमकथेसह आपलाअनोखेपणादर्शवण्‍यास सज्‍ज आहे. ही मालिका ध्रुव व ताराच्‍या जीवनप्रवासाला सादर करते. लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री रिया शर्मा १७व्‍या शतकातील राजकुमारी ताराप्रियाची प्रमुख भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. ती ‘सर्वगुण संपन्‍न’आहे आणि आसपासच्‍या निसर्गामध्‍ये सामावून जाते. ती प्रबळ इच्‍छाशक्‍ती असलेली व्‍यक्‍ती असण्‍यासोबत महत्त्वाकांक्षी, हुशार आहे आणि तिला उपचार करण्‍याचे वरदान लाभले आहे.

राजकुमारी ताराप्रियाची भूमिका साकारण्‍याबाबत रिया शर्मा म्‍हणाली, ‘‘या मालिकेने असामान्‍य प्रेमकथेबाबतचा समज मोडून काढला आहे. ही प्रेमकथा काळाच्‍या सीमांपलीकडे जाते. माझी भूमिका ताराप्रिया साकारण्‍याबाबतची खासियत म्‍हणजे ती विभिन्‍न युगामधील आहे, ज्‍याबाबत आपण सर्व अनेकदा कल्‍पना करतो, पण कधीच पाहत नाही. माझ्या मते ही मालिका प्रेक्षकांना अनोखे मनोरंजन देईल. ही मालिका दोन विभिन्‍न युगांमधील दोन व्‍यक्‍तींच्‍या जीवनप्रवासाला सुरेखरित्‍या सादर करते. अधिक काही न सांगता मला फक्‍त एवढेच सांगावेसे वाटते की, सोनी सब पाहत राहा आणि तुमच्‍यासाठी सादर केल्‍या जाणाऱ्या काही नवीन व रोमांचक मनोरंजनाचा आनंद घ्‍या.’’

Load More Related Articles

Check Also

‘आय.आय.एस.सी.’सोबत शिवाजी विद्यापीठ राबविणार संयुक्त संशोधन प्रकल्प

  ‘आय.आय.एस.सी.’सोबत शिवाजी विद्यापीठ राबविणार संयुक्त संशोधन प्रकल्प   कोल्हापू…